लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : वनमित्र मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील विविध तीन स्तरावर प्रलंबित असलेले दावे व अपिलांवर सुनावणी घेऊन आदिवासी शेतकºयांचे म्हणणे ऐकून घेण्यात येणार आहे. मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयात महिनाभर एक दिवसाआड चालणाºया या कार्यक्रमास प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी ३८३ शेतकºयांना बोलविण्यात आले होते. त्यापैकी १०-१५ वगळता सुमारे ३६५ जणांनी आपले म्हणणे समितीसमोर मांडले. जिल्हाभरातून हे शेतकरी आले होते. त्यात ग्रामसभा, उपविभागीय व जिल्हा अशा तीन स्तरावर प्रलंबित असलेल्या दावे व अपिलकर्त्यांचा समावेश होता. जिल्ह्यात या तीन स्तरावर सुमारे ८ हजार दावे व अपिल प्रलंबित आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यभरात प्रलंबित वनहक्क दावे व अपिल निकाली काढण्यासाठी हा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती या संदर्भातील म्हणणे ऐकून घेत आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी मंगळवारी प्रलंबित दावे व अपिलकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासह आवार गर्दीने फुलून गेले होते. पुरूष, महिला, तरूण व तरुणी यांचीही यावेळी उपस्थिती होती. जिल्ह्यातील बहुसंख्य आदिवासी शेतकरी संध्याकाळपर्यंत जिल्हाधिकारी आवारात थांबून असल्याने परिसरातील विविध खाद्यपदार्थ विक्रेत्यांचा चांगला फायदा झाला.