ऑनलाइन लोकमतनिजामपूर, जि. धुळे, दि. 27 - साक्री तालुक्यात गतवर्षी फुटलेले घटबारी धरण बांधले जावे या साठी अनेकवेळा पाठपुरावा करून निराश व त्रस्त झालेल्या खुडाणे येथील घटबारी जलसंधारण समितीने अखेर लोकसहभागातून व श्रमदानाने धरणाची पुनर्बाधणी करण्याचे ठरविले आहे. याबाबत जिल्हाधिकारी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी, वन विभाग धुळे यांना निवेदनाद्वारे तांत्रिक मार्गदर्शन करण्यासाठी कुणा व्यक्तीची नेमणूक व्हावी, अशीही विनंती निवेदन देवून करण्यात आली आहे.घटबारी पाझर तलाव 3 ऑक्टोबर 2016 रोजी अतिवृष्टीमुळे फुटला होता. त्यामुळे परिसरात पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले तसेच हजारो एकर शेतीचे नुकसान झाले आहे. सद्यस्थितीत परिसरातील विहिरींना पाणी नाही. परिणामी परिसरातील पाच हजार एकर बागायती क्षेत्राचे जिरायती क्षेत्रात रुपांतर झाले आहे. विहिरी आटत असल्याने पिकांना पाणी देणे कठीण होत असते. प्रति एकरी उत्पादन खर्च वजा जाता एका हंगामात निव्वळ उत्पन्न एकरी वीस हजार गृहीत धरले तरी दोन हंगामात वीस कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. त्यातुलनेत पाझर तलावाचा पुर्नबांधणीचा खर्च अत्यल्प आहे. या परिसरातील हा पाझर तलाव असणा-या पाण्याचा मुख्य स्नेत असल्याने आम्ही सर्व गावकरी एकत्र येऊन लोकसहभागातून व श्रमदानातून या पांझर तलावाची पुर्नबांधणी करण्याचे ठरविले आहे. त्यामूळे परिसरातील भूजल पातळीत वाढ होऊन शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याची सोय होईल.
पाठपुरावा करून काम होत नसल्याने लोकसहभागातून बांधणार धरण
By admin | Published: April 27, 2017 5:40 PM