लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : महानगरपालिकेत स्थायी समितीचा कारभार समांतर सभापतींकडून चालविला जात असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक तथा माजी स्थायी समिती सभापती कैलास चौधरी यांनी स्थायी समितीच्या सभेत केला़ महापालिकेच्या स्थायी समितीची सभा बुधवारी झाली़ या सभेला सभापती वालिबेन मंडोरे, उपायुक्त रविंद्र जाधव, प्ऱनगरसचिव मनोज वाघ यांच्यासह सदस्य व अधिकारी वर्ग उपस्थित होता़ सभेत विषयपत्रिकेवरील चार विषय अवघ्या पाच मिनिटात मंजूर झाले़ त्यानंतर कैलास चौधरी यांनी सभापतींचा कारभार समांतर सभापतींकडून पाहिला जात असून ते अधिकाºयांना दालनात बोलावितात़ जर हे प्रकार थांबले नाही तर त्यांचे नाव सभेत जाहीर केले जाईल असे चौधरी म्हणाले़ कचरा संकलन करणाºया ठेकेदाराचे बिल थांबविण्याबाबतचे पत्र सभापतींनी कुणाच्या तक्रारीवरून प्रशासनाला दिले? असा प्रश्न देखील कैलास चौधरी यांनी उपस्थित केला़ ठेकेदारांना अडचणीत आणण्याचे प्रकार वाढल्याचेही ते म्हणाले़ व्हॅक्युम क्लिनर वाहनाच्या विषयावरून नगरसेवक सुभाष जगताप व सहायक आरोग्याधिकारी रत्नाकर माळी यांच्यात शाब्दिक चकमक झाली़ तसेच करवसुली विभागाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण करीत विविध तक्रारी सदस्यांकडून करण्यात आल्या़
धुळे महापालिकेत ‘समांतर’ सभापतींकडून स्थायीचा कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 1:28 PM
स्थायी समितीच्या सभेत कैलास चौधरी यांचा गंभीर आरोप
ठळक मुद्दे-नगरसेवक सुभाष जगताप व सहायक आरोग्याधिकाºयांमध्ये शाब्दिक चकमक- करवसुलीमुळे नागरिकांना मनस्ताप होत असल्याचा आरोप- विषयपत्रिकेवरील चारही विषय पाच मिनिटात मंजूर