धुळे : होमगार्डची पुर्ननोंदणी कायमस्वरूपी बंद करावी, या मागणीसाठी कर्मचारी महासंघ प्रणित होमगार्ड रोजंदारी कर्मचारी संघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी निदर्शने करण्यात आली. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे, की महासमादेशक होमगार्ड महाराष्टÑ राज्य, मुंबई यांच्याकडून वेळोवेळी शासनास पत्र व्यवहार करून शासन निर्णय काढण्यात येत आहे. परंतु, या शासन निर्णयानुसार महाराष्टÑात व धुळे जिल्ह्यातील अनेक होमगार्डसवर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच होमगार्डच्या सेवा समाप्तीचे वय देखील कमी करण्यात आले आहे. त्यामुळे होमगार्डच्या व्यथा या शासनदरबारी मांडाव्यात. तसेच शासन निर्णयानुसार कमी करण्यात आलेल्या होमगार्डला शासन निर्णयास स्थगिती मिळाल्यामुळे कमी करण्यात आलेल्या होमगार्डला पूर्ववत कर्तव्यावर सामावून घेण्यास आदेश द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी संस्थापक अध्यक्ष संजय भामरे, जिल्हाध्यक्ष ए. के. सैय्यद, जिल्हा उपाध्यक्ष मनोज घोडके, कार्याध्यक्ष विवेक नेतकर, सचिव मनोज देवरे, सदस्य शेख लुकमन शेख गणी, सदस्य जितेंद्र वाघ, मच्छिंद्र मोहिते, उज्व्वल गुरव आदी उपस्थित होते. लोकप्रतिनिधींनी दिले आश्वासन निदर्शनस्थळी माजी आमदार शरद पाटील, धुळे व नंदुरबार मध्यवर्ती जिल्हा बॅँकेचे चेअरमन राजवर्धन कदमबांडे, आमदार अनिल गोटे, जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे आदी पदाधिकाºयांनी निदर्शनस्थळी भेटी दिल्या. होमगार्डच्या मागण्या पूर्ततेसाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.
होमगार्डची पुर्ननोंदणी कायमस्वरूपी बंद करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 4:56 PM
मागणी : होमगार्ड रोजंदारी कर्मचारी संघातर्फे निदर्शने
ठळक मुद्दे१२ व २१ वर्ष सेवा केलेले होमगार्डसवर कार्यवाही करण्यात येऊ नये, ती तत्काळ थांबवावी.