धुळे : आमदार अनिल गोटे यांच्या वाहनावर शनिवारी रात्री झालेल्या दगडफेक प्रकरणी वाहन चालक साजिद खान इजाज खान पठाण (रा़ मुस्लीम नगर, चाळीसगाव रोड, धुळे) यांनी शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे़ त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला़ आमदार अनिल गोटे यांच्या वाहनावर शनिवारी रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास अज्ञात दोन जणांनी दुचाकीवरून येऊन दगडफेक केली़ या घटनेनंतर शिवतिर्थ परिसरात तणाव निर्माण झाला होता़ पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली़ शहराचे आमदार अनिल गोटे हे रात्री दहा वाजता कल्याण भवन येथील लोकसंग्रामच्या कार्यालयात बसले होते़ चालक साजिद खान हे गाडी (एमएच १८ एजे ३३६६) कार्यालयाबाहेर काढून रस्त्यावर लावत असतांनाच समोरून दोन जण दुचाकीवर आले व त्यांनी वाहनाच्या काचावर दगडफेक करून काही क्षणात पळ काढला़ त्यानंतर साजिद खान यांनी तातडीने कार्यकर्त्यांना माहिती दिल्यानंतर घटनास्थळी समर्थकांनी गर्दी केली़ यावेळी काही वेळातच पोलीस अधीक्षकांसह पोलीस बंदोबस्त घटनास्थळी दाखल झाला होता़ या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता़ या घटनेनंतर समर्थकांची प्रचंड गर्दी झाली होती़ आमदारांवर रुग्णालयात उपचारघटनेनंतर आमदार अनिल गोटे यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तातडीने मालेगाव रोडवरील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ सध्या त्यांची प्रकृति स्थिर असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरु असल्याचे त्यांचे पुत्र तेजस गोटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़
आमदारांच्या वाहनावर दगडफेक, गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2018 11:52 AM
तणावाची होती स्थिती : आमदारांवर रुग्णालयात उपचार सुरु
ठळक मुद्दे आमदारांच्या वाहनावर दगडफेक प्रकरणी गुन्हा दाखलआमदार अनिल गोटे यांची प्रकृति स्थिर