ऑनलाईन लोकमत
पिंपळनेर,दि.2 : साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील आठवडे बाजार शुक्रवारी कडकडीत बंद ठेवण्यात आला. गुरुवारपासून शेतक:यांनी संप सुरू केला आहे. त्याचे पडसाद दुस:या दिवशीही पिंपळनेर शहरात दिसून आले. दरम्यान, आठवडे बाजार बंदमुळे जवळपासून 80 ते 82 लाख रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे.
शेतक:यांच्या मागण्या निकाली काढण्यासाठी शेतकरी संघटनांनी केलेल्या आवाहनाला पिंपळनेरसह पंच्रकोशीतील शेतक:यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. गुरुवारीही सायंकाळी तरुण शेतकरी मंडळींनी गावातून मोटरसायकल रॅली काढत शुक्रवारीही संपाला पाठिंबा दर्शविण्याचे आवाहन केले. त्यात शुक्रवारी पिंपळनेर शहराचा आठवडे बाजार असल्यामुळे पिंपळनेरसह लगतच्या परिसरातून येणारा भाजीपाला विक्रेते व शेतक:यांनी विक्रीसाठी आणला नाही. आठवडे बाजारात प्रसिद्ध असलेला बैल विक्रीचा बाजारातही बैल विक्रीसाठी दाखल झाले नाही.
गुजरात राज्यात भाजीपाला पाठविण्यास विरोध
पिंपळनेरसह परिसरात उत्पादीत होणारा भाजीपाला गुजरात राज्यात विक्रीसाठी पाठविण्यात येतो. परंतु, दोन दिवसापासून शेतक:यांनी गुजरात राज्याकडे जाणारा भाजीपाल्याच्या गाडय़ा अडवून धरल्या आहे. तसेच पिंपळनेर शहरातून होणारी दूधाची निर्यातही बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे गुजरात राज्यातील बहुतांश गावांना शेतकरी संपाचा फटका बसला असल्याचे बोलले जात आहे.