पिंपळनेर : शहरातील प्रतिष्ठित कांदा व्यापारी कोरोना पॉझिटिव्ह मिळून आल्यानंतर येथील उपबाजार समितीने तात्काळ दि. ३ आॅगस्टपर्यंत कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.शहरातील व्यापारी कोरोना पॉझिटिव्ह मिळाल्यानंतर कांदा लिलाव प्रक्रिया बंदचा निर्णय सोमवारी झालेल्या व्यापाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला़ सर्व व्यापाºयांनी संमती दिली़ व्यापाºयांची सुरक्षितता व शेतकºयांची सुरक्षितता लक्षात घेता कांदा लिलाव प्रक्रिया बंद ठेवण्यात आलेला आहे.कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे, आजाराचा प्रसार होऊ नये या कारणासाठी येथील उपबाजार समिती वेळोवेळी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे़ यात तालुक्यात तसेच शहरात कोरोना संसर्गजन्य रुग्णांची संख्या लक्षात घेता बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे़ जनता कर्फ्यू असो किंवा नागरिकांच्या हितासाठी ग्रामपंचायतने घेतलेला निर्णय यात बाजार समितीत आजाराचा प्रसार होऊ नये यासाठी निर्णय घेतला आहे. याच उपबाजार समितीत एक व्यापारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने सदर कोरोना आजाराची साखळी तोडण्यासाठी दि. ३ आॅगस्टपर्यंत उपबाजार समिती बंद राहील, तर कोरोना या आजारामुळे कांदा उत्पादक शेतकºयांना कांदा या पिकाचा उठाव नसल्यामुळे आर्थिक संकटाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे़ कांद्याला सध्या बाजार समितीत अल्प दर मिळत असल्याने तसेच शेतकºयांनी चाळीत ठेवलेला कांदा आता सडू लागला आहे़ उत्पन्नातही मोठी आर्थिक घट होत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी संघटना कांद्याच्या वाढीव भावासाठी केंद्र व राज्य सरकारकडे मागणी करीत आहे. त्यात कोरोना या आजाराने कांदा उत्पादक शेतकºयांचा कणा जणू मोडला आहे.
व्यापारी कोरोना पॉझिटिव्ह निघताच पिंपळनेरचा कांदा मार्केट बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 8:57 PM