पिंपळनेर : कोरोना या विषाणूचा फैलाव होऊ नये यासाठी शासनाने संचारबंदीबरोबरच लॉकडाउन जाहीर केलेले आहे. पहिल्या टप्यात या दोन्ही गोष्टीचे तंतोतंत पालन करण्यात आले. मात्र लॉकडाउनच्या दुसºया टप्यात मात्र नियम पाळण्याकडे दुर्लक्ष होऊ लागल्याचे चित्र पिंपळनेरमध्ये दिसून येत आहे. लॉकडाउन उठलेला नसतांनाही अनेकांनी दुकाने उघडल्याचे चित्र आहे. तर कुठलेही नियम न पाळता दुकानांवर गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे संचारबंदी, लॉकडाउन हे नावालाच उरली असल्याचे येथे दिसून येत आहे.तहसीलदार यांनी दुपारी गावात फिरून २१ दुकानदारांना नोटीसा देऊन कारवाई केली. तर शहरातील पान मसाला हे दुकान सील करण्यात आले त्यानंतर शहरात सर्वत्र बंद झाले.साक्री शहरात रुग्ण आढळून आल्यानंतर ग्रामपंचायत ग्रामस्तरीय समितीने पाच दिवस कडकडीत बंद पाळीत यशस्वी करून दाखविले. नियम न पाळणाऱ्यांवर कारवाईदेखील केली. सर्वसामान्य नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले. पण काही ठिकाणी ग्रामपंचायतीला विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेऊन अत्यावश्यक सुविधा देणाºया दुकानदारांसोबतच काही दुकानदारांनी आपली दुकानेही चोरून लपून सुरू करण्याचा प्रयत्न गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू आहे. दुकानावर नागरिक गर्दी करतात, सोशल डिस्टन्सची अंमलबजावणी केली जात नाही. तोंडाला मास्क लावत नाही, दुकानदारांना ही त्यांच्या आरोग्याची व समाजाची चिंता नसल्याचे दिसून येते. शहरात फिरता भाजीपाला विक्रीचा निर्णय असून भाजीपाला पुन्हा गुजरीत सुरू होऊन विक्री होत आहे. या ठिकाणी सोशल डिस्टन्स कुठेही दिसत नाही. शहरात मोठ्या प्रमाणात मोटरसायकल, तसेच मुख्य बाजारपेठेत मोठी वाहने ये-जा करीत आहेत. कोणी कोणाला बोलत नाही. पोलीसही आता कारवाई करतांना दिसत नाही. यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू झाल्याने सर्वसामान्य नागरिकांनी तसेच घरात थांबत असलेल्या नागरिकांनी यासंदर्भात चिंता व्यक्त केली आह. तर अपर तहसील कार्यालय, ग्रामपंचायत व पोलीस स्टेशन या सर्वांनी गावाच्या आरोग्यासाठी समन्वय साधण्याची गरज आहे.शासनाने लॉकडाऊन उठवला नसून नागरिक घराबाहेर मोठ्या प्रमाणात निघत आहे. ज्याला काम नाही तो ही फिरतांना दिसतो. रात्री लोक मोठ्या संख्येने बाहेर फिरण्यासाठी निघतात. यासाठीच पिंपळनेर शहराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असल्याने गावाचे आरोग्य सुरळीत ठेवण्यासाठी पिंपळनेर ग्रामपंचायतीने नागरिकांच्या आरोग्यासाठी योग्य तो निर्णय घ्यावा असे सर्वसामान्य नागरिक, कापड विक्रेते यांनी उपसरपंच विजय गांगुर्डे यांच्याकडे बोलून दाखवले व मागणी केली.वरिष्ठ अधिकाºयांनीही या भागाचा दौरा करून ग्रामपंचायत प्रशासन यांच्याशी व संबंधित विभागाला आदेश करावेत तसेच जिल्हा बंदी असून वाहनांची तपासणी करूनच सोडण्याच्या सूचना कराव्यात अशी अपेक्षा आहे.अशीच स्थिती राहिली तर धोक्याची शक्यतापिंपळनेर पासून अवघ्या काही अंतरावर मालेगाव शहराची हद्द आहे. पिंपळनेर शहर धोक्याच्या काही अंतरावर आह. शहरापासून काही अंतरावर असलेल्या नामपूर येथे कोरोना रुग्ण मिळून आला आहे.दररोज मालेगावकडून भाजीपाला घेऊन येणारी वाहने शहरात येतात अशी चर्चा आहे, यावर कोणीच प्रश्न उपस्थित करीत नाही. यात नागरिकांची अशीचजर गर्दी वाढू लागली, तर कोरोना या आजाराला आपण पोषक वातावरण निर्माण करत आहोत, याचे भान ठेवा, असा सूचक इशारा अपर तहसीलदार विनायक थविल यांनी दिला आहे. तसेच प्रत्येकाच्या समस्या ऐकून त्याचे निराकरण करत आहेत, चुकीच्या मार्गाने जाणाºयांना धडा शिकवत नोटिसा देऊन तसेच दुकानेही सील करीत आहेत.
पिंपळनेरमध्ये संचारबंदी, लॉकडाउन उरले फक्त नावालाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 8:51 PM