आॅनलाइन लोकमतधुळे : महानगरपालिका निवडणुकीसाठी रविवारी मतदान होत आहे. महापालिकेच्या हद्दित समाविष्ट झालेल्या पिंप्री गावातील मतदान केंद्राबाहेरही मतदारांची गर्दी होती. मात्र मतदान केंद्रापर्यंत कोणी पोहचत नव्हते. सकाळी १०.३० पर्यंत अवघ्या ४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला ‘नळांना पाणी सुटत नाही तोपर्यंत कोणी बाहेर पडणार नाही’ अशी चर्चा गावात सुरू होती.महापालिका हद्दित पसिररातील जी १० गावे समाविष्ट झालेली आहेत, त्यात पिंप्री या गावाचाही समावेश आहे. मात्र महापालिकेच्या हद्दित समाविष्ट होण्यास या गावातील ग्रामस्थांचा विरोध होता, तो काही प्रमाणात आजही आहे. त्याचे परिणामही या मतदानावर दिसून येत असल्याची चर्चा होती. पिंप्री गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रभाग १९ चे मतदान केंद्र असून, या ठिकाणी दोन बुथ आहेत. या केंद्रावर एकूण ८९१ मतदार आहेत. पैकी सकाळी १०.३० वाजेपर्यंत बुथ क्रमांक १९/१ वर ४४३ पैकी फक्त २ व बुथ क्रमांक १९/२ वर ४४८ पैकी २ अशा फक्त चार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतदान केंद्राबाहेर गर्दीदरम्यान मतदान केंद्राबाहेर युवक, ग्रामस्थांची बºयापैकी गर्दी दिसून आली होती. मात्र मतदान केंद्रापर्यंत कोणी पोहचत नव्हते. त्यामुळे मतदान केंद्रात शुकशुकाट बघावयास मिळाला. केंद्राबाहेर पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला होता. मात्र मतदानासाठीच कोणी येत नसल्याने, केंद्रावर शांतता असल्याचे पोलिसांनी सांगितले. ‘नळाला पाणी सुटल्याशिवाय कोणी बाहेर पडत नाही’ अशी चर्चा या ठिकाणी सुरू होती. दरम्यान या गावातील बहुतांश नागरिक हे ऊस तोडण्यासाठी जातात. त्याचाही परिणाम मतदानावर होत असल्याचीही चर्चा होती. दरम्यान धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी पिंप्री गावात येऊन ग्रामस्थांना मतदान करण्याचे आवाहन केल्याचे ग्रामस्थांनीच सांगितले. बाळापूरला मतदारांचा उत्साहदरम्यान पिंप्री गावाच्या उलट स्थिती बाळापूर गावात बघावयास मिळाली. येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रभाग ११ चे मतदान केंद्र असून, पाच खोल्यांमध्ये मतदान सुरू होते. मतदान केंद्राबाहेर उमेदवारांच्या समर्थकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. याठिकाणीही मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. मतदान शांततेत सुरू असल्याचे पोलीस कर्मचारी अतुल पाटील यांनी सांगितले.
Dhule Municipal Election 2018 : पिंप्री गावात मतदान केंद्राबाहेर गर्दी मात्र केंद्रात शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2018 11:34 AM
सकाळी १०.३० पर्यंत अवघ्या ४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला
ठळक मुद्देमहापालिकेसाठी सकाळी ७.३० वाजेपासून मतदान सुरूपिंप्रीत सकाळी १०.३० पर्यंत अवघ्या ४ मतदारांनी केले मतदानबाळापुरला मात्र मतदारांमध्ये उत्साह