शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेसची चौथी उमेदवार यादी जाहीर, अंधेरीत उमेदवार बदलला; कुणाला मिळाली संधी?
2
विद्यमान आमदाराचा पत्ता कट! शिंदेंनी माजी खासदाराला दिली विधानसभेची उमेदवारी
3
Maharashtra Vidhan Sabha 2024 : महाविकास आघाडीत जागावाटपात घोळ? सोलापूरात एकाच जागेवर ठाकरेंचा अन् काँग्रेसचा उमेदवार
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: सस्पेन्स संपला! आदित्य ठाकरेंविरोधात शिंदेंचा उमेदवार ठरला; दुसऱ्या यादीत कोणाची नावे?
5
मनसेने जाहीर केली सहावी यादी; अशोक चव्हाणांच्या मुलीविरोधात 'हा' उमेदवार मैदानात
6
Maharashtra Election 2024: "...पण काही लोकांबद्दल मला दुःखही आहे", फडणवीस असं का म्हणाले?
7
महायुतीच्या जागावाटपात रिपब्लिकन पक्ष अद्यापही वेटिंगवरच; आठवले नाराज, फडणवीसांनी दिला मोठा शब्द
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत मानसिंगराव नाईक की सत्यजित देशमुख, कोण मारणार बाजी? महाडिक बंडखोरीच्या तयारीत
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, मविआ'ला खोचक टोलाही लगावला
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : इंडिया आघाडीमध्ये फूट? विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव उमेदवार उभे करणार; महाविकास आघाडीच्या अडचणी वाढणार
11
Maharashtra Election 2024: शरद पवार- एकनाथ शिंदेंच्या 'या' उमेदवारांनी घेतली जरांगेंची भेट
12
अर्ज भरण्यासाठी उरले फक्त 2 दिवस; महायुती-मविआत जागावाटपाचा तिढा कायम...
13
 शरद पवारांनी दिलं तिकीट; कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक, काय म्हणाले फहाद अहमद?
14
युगेंद्र पवारांसाठी वडील श्रीनिवास पवार मैदानात; ग्रामदैवताला नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
16
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
17
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
18
इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी
19
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा
20
अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार: बारामती विधानसभा कोणासाठी सोप्पी, आकडे काय सांगतात?

दोंडाईचा-साक्री रस्त्यावर खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 9:39 PM

मालपुर : प्रवाशी व वाहनधारकांकडून रस्ता दुरुस्तीची मागणी

मालपूर : शिंदखेडा तालुक्यातून जाणाऱ्या दोंडाईचा रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस अपघाताच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष घालून या रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे.दोंडाईचा- साक्री रस्त्याची खड्ड्यांमुळे पार दुरवस्था झाली आहे. साईडपट्टयांवरुन काही ठिकाणी खाजगी कंपनीचे केबल वायर टाकण्यात आल्याने साईडपट्ट्या खचल्या आहेत. या रस्त्यावरुन सातत्याने वाहनांची वर्दळ सुरु असते. मात्र, रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने हा रस्ता धोकेदायक ठरत आहे. अनेकदा वळणावर खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात दुचाकीस्वार घसरुन पडून अपघाताच्या घडत आहेत. यातून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.दोंडाईचाहून साक्रीकडे जाण्यासाठी हा सर्वात जवळचा मार्ग आहे. तसेच याच रस्त्यावरून जैन समाजबांधवांचे तीर्थक्षेत्र असलेल्या बळसाने येथे मोठ्या प्रमाणावर भाविक दुरदुरवरुन येतात. मात्र, रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून साईडपट्टयांवरुन खाजगी कंपनीने जेसीबीच्या सहाय्याने खोदून केबल वायर टाकल्यामुळे तेथील भराव खचला आहे. यामुळे साईडपट्टयांवर वाहन उतरविणे देखील जोखमीचे झाले आहे. यामुळे वाहन चालकांना नाहक मनस्ताप सोसावा लागत असून प्रवाशी व वाहन चालकांनी वेळोवेळी रस्ता दुरुस्ती व खड्डे बुजवण्याची मागणी करुनही सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे म्हणणे आहे. अनेक ठिकाणी खड्डे चुकविण्यासाठी वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असून तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशीवर्गाकडून होत आहे.

टॅग्स :Dhuleधुळे