आॅनलाईन लोकमतधुळे : भाविकांचे श्रद्धास्थान असलले महाराष्टÑातील साडेतीन पीठापैकी एक शक्तीपीठ म्हणून गणल्या जाणाºया सप्तश्रृंगी देवीच्या चैत्र यात्रोत्सवास प्रारंभ झालेला आहे. यात्रोत्सवात गडावर देवीच्या दर्शनासाठी जाणाºया भाविकांची संख्या प्रचंड आहे. भाविकांच्या सोयीसाठी एस. टी. महामंडळाच्या धुळे विभागातील ९ आगारांमार्फत नांदुरी गडासाठी ३१० जादा बसेस सोडण्यात येणार आहे. यातून धुळे विभागाला एक कोटी ३६ लाखांचे उत्पन्न अपेक्षित आहे. सप्तश्रृंगी गडावर चैत्र महिन्यात यात्रा भरत असते. या यात्रोत्सवादरम्यान खान्देशातील हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी गडावर असतात.यातील काही पायी तर काही महामंडळाच्या बसने गडावर जातात. गडावर जाणाºया भाविकांसाठी महामंडळातर्फे दरवर्षी जादा बसेस सोडण्यात येत असतात. यावर्षीही धुळे विभागातर्फे नांदुरीगडासाठी आगारनिहाय जादा बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. २५ मार्च ते २ एप्रिल २०१८ अशा ९ दिवसांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.आगारनिहाय सोडण्यात येणाºया बसेस अशा- धुळे ६० बसेस, शिरपूर ६०, साक्री-३२, शिंदखेडा- १८, दोंडाईचा -२०, नंदुरबार-५०, शहादा-३०, नवापूर-३०, अक्कलकुवा-१० अशा एकूण ३१० बसेस सोडण्यात येणार आहे.गेल्यावर्षीही अशाच प्रकारे नांदुरीगडासाठी जादा बसेस सोडण्यात आलेल्या होत्या.त्यातून १ कोटी १३ लाख ७ हजार रूपयांचे उत्पन्न धुळे विभागाला मिळाले होते.यावर्षी या यात्रोत्सवातून एक कोटी ३६ लाखाचे उत्पन्न मिळणे अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान यात्रोत्सवाच्या कालावधीत महामंडळाचे सुमारे ७० अधिकारी, व कर्मचारी गडावर उपस्थित राहणार आहेत.लाभ घेण्याचे आवाहनएस.टी.महामंडळाच्या धुळे विभागातर्फे भाविकांच्या सोयीसाठी जादा बसेस सोडण्यात येत असून, त्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
धुळे विभागातून नांदुरी गडासाठी ३१० बसेस सोडण्याचे नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 12:19 PM
विभागाला १ कोटी ३६ लाखांचे उत्पन्न अपेक्षित, लाभ घेण्याचे आवाहन
ठळक मुद्देधुळे विभागातर्फे चैत्रोत्सवासाठी नियोजनआगारनिहाय सोडण्यात येणार जादा बसेस९ दिवसात एक कोटी ३६ लाखांचे उत्पन्न अपेक्षित