धुळे : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता ही सेवा या मोहिमेअंतर्गत शहरात स्वच्छता करण्यात येत आहे़ त्यासाठी मंगळवारी दुपारी मनपा विविध समाजाची धर्मगुरूची बैठक घेण्यात आली़ २७ आॅक्टोबर पर्यंत स्वच्छता ही सेवा ही मोहिमेतून नागरिकांमध्ये प्लास्टिक न वापरण्याबद्दल जनजागृती होण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले़ श्री़ एकवीरा देवी ट्रस्टचे अध्यक्ष सोमनाथ गुरव यांनी नवरात्रोत्सवात प्लास्टिक बंदीच्या जनजागृतीसाठी परिसरात बॅनर लावण्यात येईल असे सांगितले़ यावेळी हिंदू धर्म संघटने राजू महाराज, फादर फादर संदीप कोल्जे यांनी मार्गदर्शन केले़ आयुक्त अजीज शेख यांनी मोहिमेत योगदान देणाºया धर्मगुरूचे सत्कार केला़ स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरीसाठी शासन नियक्त समन्वय अधिकारी शरयू सनेर यांनी प्लास्टिक बंदी बाबत तसेच स्वच्छ सर्वेक्षण २०२० अंतर्गत स्वच्छता ही सेवा मोहिमाता घेऊन कशा पद्धतीने राबवता येईल याबाबत मार्गदर्शन केले़ तसेच आरोग्य अधिकारी डॉ.मधुकर पवार यांनी मार्गदर्शन केले़यावेळी उपायुक्त गणेश गिरी, सहाय्यक आयुक्त शांताराम गोसावी, पल्लवी शिरसाठ, चंद्रकांत जाधव, लक्ष्मण पाटील, राजेश वसावे, महेंद्र ठाकरे, विकास साळवे, संदीप मोरे, साईनाथ वाघ, प्रमोद चव्हाण, गजानन चौधरी, शुभम केदार उपस्थित होते.
प्लॅस्टिक बंदी, स्वच्छतेवर भर देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 10:56 PM