धुळे : दीड वर्षापूर्वी झालेल्या प्लॉट विक्रीच्या वादातून काळखेडा येथे महिला सरपंच सुरेखा सतीश मोरे व त्यांच्या मुलास शनिवारी मारहाण करण्यात आली. या प्रकरणात सरपंच या साक्षीदार आहेत. याप्रकरणी सात जणांविरुद्ध धुळे तालुका पोलीस स्टेशनला रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादीनुसार काळखेडा येथील संचीलाल ओंकार मोरे (ह.मु.आकुर्डी, पुणे) यांनी दीड वर्षापूर्वी गावातील शांताराम सीताराम मोरे यांच्याकडून प्लॉट विकत घेतला होता. तो प्लॉट देण्यास नकार दिल्यानंतर त्याचे पैसे परत करा अशी मागणी : मोरे यांनी केली. त्याचा राग येऊन शनिवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास शांताराम सीताराम मोरे, उषाबाई शांताराम मोरे, प्रविण शांताराम मोरे, सरुबाई शांताराम मोरे, हिरुबाई शांताराम मोरे, लक्ष्मीबाई शांताराम मोरे यांनी प्लॉट खरेदीच्या व्यवहारातील साक्षीदार असलेल्या महिला सरपंच सुरेखा सतीष मोरे व त्यांच्या मुलास मारहाण केली.याप्रकरणी धुळे तालुका पोलीस स्टेशनला वरील सर्व सात आरोपींविरुद्ध भादंवि कलम 279, 337, 338, 427 सह मो.वा.का.कलम 184, 134/177 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्लॉटच्या वादातून महिला सरपंचास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2017 12:28 AM