म्हसदी : साक्री तालुक्यातील म्हसदी येथे पाणी आडवा -पाणी जिरवा या संकल्पनेतून अमरावती नदीपात्रात खोलीकरण करण्यासाठी नांगरणी करण्यात येत आहे.यासाठी ग्रामपंचायतीत बैठक घेवून कामाचा सर्वानमुते ठराव करण्यात आला. त्यासाठी निधी जमा करण्यात आला. जलस्थर वाढवण्यासाठी ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी पाणी आडवा- पाणी जिरवा मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत अमरावती नदी पात्रात आडवी नांगरणी करण्यास सुरवात केली आहे. यानंतर खड्डे करणे जागोजागी बांध टाकण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला आहे. म्हसदी ग्रामपंचायतचे सरपंच दीपक जैन, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ वसंतराव गुंजाळ, महेंद्र देवरे, गंगाराम देवरे, वसंत देवरे, कुणाल भदाणे, भिकन सावळे, विजय भदाणे, किशोर भदाणे, संतोष देवरे, प्रवीण देवरे आदींनी म्हसदी येथे जलक्रांती करण्याचा मनसुबा ठेवत जलसिंचनाचे काम हाती घेतले आहे. २७ रोजी या कामाचा शुभारंभ झाला. वसंतराव शामराव गुंजाळ, भिकन नथु सावळे, शरद उत्तम भदाणे, रमजान सुपडू पिंजारी, या नांगरणी ट्रॅक्टर दिले असून इंधन व्यवस्था करण्यात आली आहे. अमरावती नदी काठावरील विहिरीने तळ गाठला आहे. लोकसहभागातून हा उपक्रम राबविला जाणार आहे. अनेक दात्यांनी आपापल्या परीने सढळ हाताने मदत केली आहे. गावासाठी पिण्याचे पाणी व सिंचनाच्या प्रश्नासाठी प्रयत्न यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत व लोकसहभागातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
म्हसदी येथे अमरावती नदीपात्रात नांगरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 9:38 PM