शिरपूर : येथील आर.सी.पटेल प्राथमिक शाळेत जलसंवर्धन पंधरवाडा अंतर्गत काव्यरचना व काव्यगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमास मुख्याध्यापक सी.डी.पाटील, संदीप चौधरी, गोपाल न्हावी, अविनाश राजपूत आदी उपस्थित होते. काव्यरचना व गायन स्पर्धा इयत्ता तिसरी व चौथी वर्गातील मुलांकरीता घेण्यात आली़ एखादा विषय देऊन त्यावर काव्यरचना करता यावी याकरिता शाळा व्यवस्थापन नेहमीच आग्रही भूमिका घेत असते.जलसंवर्धन पंधरवडा अंतर्गत विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्त्व बालपणापासून व्हावे या उदात्त हेतूने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेत़ तालुक्याचे आमदार अमरिशभाई पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी जलसंवर्धनाचा शिरपूर पॅटर्न देशाला दिला. शिरपूर पॅटर्नमुळे हजारो एकर जमीन ओलिताखाली आली असल्याचे मत मुख्याध्यापक सी.डी.पाटील यांनी मनोगतातून व्यक्त केले.जलसंवर्धन पंधरवडा संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.उमेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहे. काव्य रचना व काव्यगायन स्पर्धेत अनुश्री राजपूत, प्रांजल सोनवणे, वृषाली पाटील, नव्या पाटील, प्रतीक पाटील, मधुरा जडिये, वेदांत बारी, अनुष्का पाटील, ध्रुव गिरासे, अथर्व भावसार यांनी यश मिळविले़ कार्यक्रम यशस्वीतेसाठी रमेश शिरसाठ, तुळशीराम पावरा, संदीप पाटील, सागर पवार, यशोदा पाटील यांनी परिश्रम घेतलेत़ कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गजेंद्र जाधव यांनी केले.जलक्रांती पंधरवाडा तांडे- येथील मुकेशभाई आर.पटेल मुला-मुलींची सैनिकी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात जलक्रांती पंधरवाडा अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले़ तालुक्यात जलसंवर्धन अंतर्गत राबवलेल्या जलक्रांती मोहीमवर आधारित संस्थेच्या माध्यमातून जलक्रांती पंधरवाडा अभियान राबविण्यात येत आहे.कार्यक्रमास शशिकांत जाधव, किशोर रणदिवे, ज्ञानेश्वर माळी, नंदकिशोर बाविस्कर, शरद पवार, प्रदिप गिरासे, मिलिंद वाघ यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिका आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काव्यरचना व काव्यगायन स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2019 10:18 PM