धुळे : संचारबंदी असताना बुधवारी रात्री सव्वा बारा वाजेदरम्यान भोला बाजार चौकात घोळका करुन बसलेल्या तरुणांना हटकले असता आमदार पुत्राने पोलिसांशी हुज्जत घातली तसेच तुम्ही दारुच्या नशेत आहात असे म्हणत मोबाईलद्वारे व्हिडीओ शुटिंग केले.
पोलिसांना दमदाटी व शिवीगाळ केल्याप्रकरणी पोलीस शिपाई दिपक पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आमदापुत्रासह जमावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळ्याचे आमदार फारुक शहा यांचा मुलगा शाहबाज याने तुम्ही दारूप्यायलेले आहात, असे म्हणत दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली.