शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
3
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
4
नाकाबंदीत थरार! नागपुरात कारचालकाने पोलीस अधिकाऱ्याला फरफटत नेले; सेंट्रल एव्हेन्यूवरील घटना
5
हृदयद्रावक! दुसऱ्यांच्या मुलांना वाचवण्यासाठी जीव धोक्यात घातला, पण स्वतःच्या जुळ्या मुली गमावल्या
6
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल
7
Mumbaikar Cricketer Jemimah Rodrigues, WBBL 10: मुंबईकर पोरीने ऑस्ट्रेलियामध्ये केला मोठा धमाका! गोलंदाजांची धुलाई करत फिरवला सामना
8
PM मोदींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; नायजेरियाने केला सर्वोच्च पुरस्काराने सन्मान
9
श्रीदेवीसोबत कसं होतं नातं? माधुरी दीक्षितचा खुलासा; म्हणाली, "आम्ही कधीच एकत्र..."
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
11
"माझा मुलगा ॲनिमलमधील रणबीरसारखा", अल्लू अर्जुनचं लेकाबाबत वक्तव्य, म्हणाला- "जर मी त्याच्या आईबरोबर..."
12
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
13
भारताकडून हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, मोजक्या देशांच्या यादीत मिळवलं स्थान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
15
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
16
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
17
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
18
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
19
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
20
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड

पोलीस निरीक्षकास मारहाण

By admin | Published: March 24, 2017 12:25 AM

एकास अटक, सात संशयित फरार

धुळे : शहरातील चाळीसगाव चौफुलीवर वाहन काढून घेण्यास सांगिल्याच्या कारणावरून वाद घालत वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षकांच्या हातातील लाठी हिसकावून त्यांनाच मारहाण, धक्काबुक्की व दमदाटी केल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली होती़ याप्रकरणी आठ जणांविरुद्ध मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एकाला अटक केली आहे़, तर इतर फरार आहेत़ शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक देवरे (वय ५८) यांच्यासह कर्मचारी २२ मार्च रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास चाळीसगाव चौफुलीवर पेट्रोलिंग करीत होते़ तेव्हा होली चाईल्ड स्कूलसमोर रस्त्यावर उभ्या ट्रकमुळे (क्ऱ एमएच १८-एसी ०२७९) रहदारीस अडथळा निर्माण झाल्याने देवरे यांनी माईकवरून ट्रक काढून घेण्याबाबत सांगितले़ मात्र ट्रकमालक योगेश कंड्रे याने ट्रक काढणार नाही, काय करायचे ते करून घ्या, असे बोलून गर्दी गोळा केली़ शासकीय कामात अडथळा निर्माण करून पुढील शासकीय कारवाई करू नये म्हणून देवरे यांच्या हातातील लाठी हिसकावून  देवरे यांना मारहाण करीत धक्काबुक्की केली़ तसेच दमदाटी करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला़ याप्रकरणी अशोक देवरे यांच्या फिर्यादीवरून हरीश विभुते, पवन विभुते, योगेश कंड्रे, नीलेश प्रकाश विभुते व इतर तीन ते चार जणांविरुद्ध भादंवि कलम ३५३, ३३२, १४३, १४७, १८८, १८९, ५०४, ५०६ व मोटार वाहन कायदा कलम १२२/१७७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे़            पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक जयंत शिरसाठ करीत आहेत़ पोलिसांनी पवन विभुते याला अटक केली आहे़, तर इतर संशयित फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले़