धुळे : गणरायाच्या मुर्तीचे गुरुवारी विसर्जन होणार आहे़ या अनुषंगाने पोलीस प्रशासन अर्लट असून शहरातील संवेदनशील भागात मंगळवारी संचलन करण्यात आले़गणरायाच्या मुर्तीची स्थापना २ सप्टेंबर रोजी झाल्यानंतर स्थानिक पोलीस आपआपल्या हद्दीत सज्ज झाले होते़ यानंतर दोंडाईचा, निजामपूर याठिकाणी श्रींच्या मुर्तीचे विसर्जन असल्यामुळे याठिकाणच्या बंदोबस्तासाठी पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची एक तुकडी पाठविण्यात आली होती़ याठिकाणचा चोख बंदोबस्त झाल्यानंतर धुळे शहराकडे लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे़ दरवर्षाप्रमाणे यंदाही गणरायाच्या मुर्तीचे विसर्जनाचा कार्यक्रम सर्वत्र असल्यामुळे पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली गाव पातळीवर पोलिसांचा बंदोबस्त तैनात ठेवलेला होता़ गुरुवारी श्रींच्या मुर्तीचे विसर्जन होणार आहे़ या अनुषंगाने शहरातील संवेदनशील भागात पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली हे संचलन करण्यात आले़ यावेळी धुळे शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह पोलीस, राज्य राखीव पोलीस दलाचे जवान, होमगार्ड आणि बँड पथक या संचलनात सहभागी झाले होते़
संवेदनशील भागात पोलिसांचे संचलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 11:06 PM