लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहर हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या १० गावांसह एकूण १७ गावांचे पोलीस पाटील पद रद्द करण्यात येत असल्याचे आदेश प्रांताधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी गणेश मिसाळ यांनी काढले आहेत़शहर हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या मोराणे, वरखेडी, बाळापूर, महिंदळे, भोकर, नकाणे, पिंपरी व अवधान गावात पोलीस पाटील पदे कार्यरत आहेत़ त्यापैकी चितोड येथे श्रावण पवार यांची नियुक्ती असून उर्वरीत पदे रिक्त आहेत़ दरम्यान, चितोड हे गाव मनपा हद्दीत गावठाणासह समाविष्ट झाले असले तरी तेथील पोलीस पाटील पद ३० जून २०२१ पर्यंत नुतनीकरण करण्यात आल्याने ते कार्यरत ठेवण्यात येणार असल्याचे आदेशात नमुद आहे़ त्याचप्रमाणे हद्दवाढीतील गावांव्यतिरीक्त नेर (म़रायवट), मुकटी, आर्वी, शिरूड, बोरीस, दहिवेल व वार्सा या गावांमध्ये असलेल्या आऊट पोस्टमधील पोलीस पाटील ही सर्व रिक्त पदे देखील रद्द करण्यात आली आहेत़ तसेच मोहाडी, सोनगीर, साक्री, पिंपळनेर, निजामपूर-जैताणे येथे पूर्वीच पोलीस ठाणे असल्याने तेथील पोलीस पाटील पद शासन परिपत्रकान्वये यापूर्वीच व्यपगत झाली आहेत़
धुळे शहर हद्दवाढीतील १० गावांसह १७ गावांमधील पोलीस पाटील पदे रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 6:14 PM
प्रांताधिकाºयांचे आदेश, चितोड पोलीस पाटील पद राहणार कार्यरत
ठळक मुद्देपोलीस पाटील पदे रद्द करण्याचे प्रांताधिकाºयांचे आदेशचितोड येथे पोलीस पाटील २०२१ पर्यंत राहणार कार्यरतपाच गावांमधील पोलीस पाटील पदे आधीच व्यपगत