लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : वादविवाद करणाऱ्यास हटकले म्हणून पोलीस उपनिरीक्षकाला शिवीगाळ करत त्यांच्यावर तलवार उगारल्याची घटना शनिवारी रात्री शिरपुरात घडली़ याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.स्वप्निल राजपूत, मनोज राजपुत व हितेश राजपूत यांना ताब्यात घेण्यात आले आहे, तर शिवा राजपूत व योगेशराजपूत हे पसार आहेत. येथील बसस्थानकासमोर शनिवारी रात्री पाचजण आपआपसात हुज्जत घालत होते.पोलीस उपनिरीक्षक मुकेश गुजर यांनी त्यांना हटकले़ त्या पाच जणांनी शिवीगाळ करीत गुजर यांना तलवारीचा धाक दाखवत जिवे मारण्याची धमकी दिली़मिरवणुकीत तलवार नाचविणाऱ्याविरुद्ध गुन्हाशिरपूरात(धुळे) शनिवारी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीत तलवार उंचावून नाचताना अंकित देशमुख या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले़ त्याच्याकडून पाचशे रुपये किमतीची साडेतीन फुटी तलवार हस्तगत करण्यात आली आहे़ याप्रकरणी अंकितविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस उपनिरीक्षकावर धुळ्यात उगारली तलवार
By admin | Published: May 29, 2017 4:29 AM