धुळे : पोलीस ठाणे आवारातच वर्दीतील पोलीस डीजेच्या तालावर चांगलेच थिरकल्याचे चित्र बुधवारी रात्री तालुका पोलीस ठाण्यात दिसून आले़ उपनिरीक्षकांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमानंतर हा प्रकार घडला़ या प्रकाराची पोलीस वर्तुळात दिवसभर चर्चा रंगली होती़ धुळे तालुका पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मिलिंद बनसोडे हे सेवानिवृत्त झाल्याने त्यानिमित्त पोलीस ठाणे आवारात कार्यक्रम ठेवण्यात आला होता. सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमानंतर पोलीस ठाणे आवारातच डीजे वाजविण्यात आला़ त्यात वर्दीतील पोलीसही चांगलेच थिरकले़ वास्तविक पोलीस ठाणे आवारात डीजे वाजवू नये असा आदेश आहे. मात्र, इथं हा नियम सरळ पायदळी तुडवला गेला. ध्वनिप्रदूषणासंदर्भात काही दिवसांपूर्वीच पोलीस अधीक्षकांनी जनतेला आवाहन केले होते़ मात्र, आता धुळ्यातील पोलिसांनीच ध्वनिप्रदूषण कायदा पायदळी तुडवल्याचे दिसून आले़ सेवानिवृत्ती कार्यक्रमात डीजे की स्पिकर लावला होता, हे सांगता येणार नाही़ याबाबत उपअधीक्षकांना चौकशीचे आदेश दिले आहेत़ सीसीटीव्ही फुटेजही बघण्यात येईल़ -चैतन्या एस.पोलीस अधीक्षक, धुळे
वर्दीतील पोलीस डीजेच्या तालावर
By admin | Published: March 03, 2017 12:00 AM