शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

गस्तीवरील पोलिसांची सतर्कता अखेर ‘लुटी’चा प्रयत्न फसला़़़!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 9:47 PM

सुरत बायपासवरील घटना : एकास अटक, वाहनांसह मुद्देमाल जप्त, पुन्हा २ संशयित ताब्यात

धुळे : सुरत बायपासवर अंधाराचा फायदा घेत लुटीच्या प्रयत्नात असलेल्या लुटारुंचा मनसुबा शहर पोलिसांच्या गस्तीवरील पथकाने उधळून लावला़ पोलिसांनी दरोडेखोरांपैकी एकाला पाठलाग करुन पकडले़ वाहनांसह साडेपाच लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे़ दरम्यान, दोन संशयितांना रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरु असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले़ शहर पोलीस ठाण्याचे गस्तीपथक शनिवारी पहाटे २ वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे गस्त घालत होते़ सुरत बायपासवरील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयसमोर असलेल्या नवीन पुलाजवळ एमएच ३९ एडी २८८६ ही पांढºया रंगाची पिकअप व्हॅन संशयास्पद रितीने उभी असलेली दिसली़ पोलिसांनी त्या वाहनाजवळ आपले वाहन नेले असता पोलिसांना पाहून तेथून चौघांनी पळ काढला़ पोलिसांनी देखील नाट्यमयरित्या त्यांचा पाठलाग केला़ मात्र, अंधाराचा फायदा घेत त्यातील तिघे पळून गेले़ तर एक जण पोलिसांच्या हाती लागला़ पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताचे मनोज योगराज पाटील (२८, रा़ क्रांतीचौक, मोहाडी उपनगर, धुळे) असे नाव आहे़ तर त्याचे पळून गेलेल्या साथीदार संशयितांमध्ये सागर धुमाळ, बन्सी गोसावी (दोघी रा़  मोहाडी) (पूर्ण नाव माहिती नाही) आणि अन्य एक अनोळखी इसम असल्याची माहिती पोलिसांनी दिली़ घटनास्थळावरुन पोलिसांनी ५ लाख रुपये किंमतीची महिंद्रा पिकअप व्हॅनसह २५ हजार रुपये किंमतीची एमएच १८ यू ८०५३ क्रमांकाची मोटारसायकल, साडेनऊ हजार रुपये किंमतीचे गॅस कटर, ५०० रुपये किंमतीचे हॉकी स्टीक व दोन लोखंडी पाईप, १० हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल असा एकूण मुद्देमाल शहर पोलिसांच्या गस्ती पथकाने जप्त केला आहे़ या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, शहर पोलीस निरीक्षक राजकुमार उपासे यांनी घटनास्थळी भेट दिली़ हेड कॉन्स्टेबल राजेंद्र सूर्यवंशी यांनी फिर्याद दिली़ त्यानुसार, संशयित मनोज पाटीलसह चौघांविरुध्द गुन्हा दाखल झाला़ ही कारवाई शहर पोलीस निरीक्षक राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक हिरालाल बैरागी, नाना आखाडे तसेच भिका पाटील, राजेंद्र सूर्यवंशी, प्रकाश पाटील, संदिप पाटील, मुक्तार मन्सुरी, राहुल पाटील, नरेंद्र परदेशी होमगार्ड सागर मोरे यांनी केली आहे़ संशयित मनोज पाटील याला न्यायालयात हजर केले असता २७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली़ डी़ पी़ पाटील तपास करीत आहे़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी