धुळे : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तालुक्यातील रावेर शिवारात जंगलात सुरू असलेला दारूचा गावठी दारू निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त केला. ही कारवाई सोमवारी दुपारी दोन वाजेदरम्यान करण्यात आली. याप्रकरणी धुळे तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े धुळे तालुक्यातील रावेर गावाजवळील नंदा भवानी मंदिराच्या पाठीमागे असलेल्या जंगलातील नाल्याकिनारी काटेरी झुटपात गावठी हातभट्टीची दारू बनविण्यात येत असल्याची गुप्त माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक देवीदास शेळके यांना मिळाली़ त्यानुसार त्यांच्या पथकाने 6 फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास तेथे छापा टाकला़ तेथे हातभट्टीची दारू गाळण्याचे काम सुरू असल्याचे दिसून आल़े पोलिसांना पाहून दोन जण पसार झाल़े तेथे 15 हजार रुपये किमतीची दोन रबरी टय़ुबमध्ये प्रत्येकी 150 लीटर गावठी दारू मिळून आली़ तसेच 3 प्लॅस्टीक कॅन, 7 ड्रममध्ये आंबुस उग्र रसायनाचा वास येत असलेले रिकामे पत्र्यांचे ड्रम व 3 हजार रुपये किमतीच्या दोन पत्री ड्रममध्ये प्रत्येकी 150 लीटर दारू बनविण्याचे रसायन आढळून आल़े पोलिसांनी जागीच दारू व रसायन नष्ट केल़े ही कारवाई पथकातील पो़ना. संदीप थोरात, पो़ह़ेकॉ. जितेंद्र आखाडे, पो़कॉ. नितीन मोहने, चेतन कंखरे, विजय सोनवणे यांनी केली़ याप्रकरणी पो़कॉ. विजय मदने यांनी धुळे तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आह़े दरम्यान पथकाने देवपूर परिसरातही छापा टाकून गावठी दारूचा साठा जप्त केला़ त्याबाबत देवपूर पोलिसात गुन्हा दाखल झाला आह़े जुगार अड्डय़ावर छापाएलसीबीच्या पथकाने सोमवारी शहरातील चितोड रोड परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्डय़ावर छापा टाकला़ तेथे सार्वजनिक जागी जुगार खेळणा:या पाच जणांना ताब्यात घेण्यात आल़े त्यांच्याकडून रोख रकमेसह जुगाराचे साहित्य जप्त केल्याचे सांगण्यात आल़े
गावठी दारू निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त
By admin | Published: February 07, 2017 12:58 AM