ऑनलाईन लोकमत
धुळे,दि.13 - पॉईंट ऑफ सेल्स अर्थात पीओएस मशीनचा खत विक्रेते आणि रेशन दुकानदारांसाठी प्रशासनातर्फे पुरवठा सुरू करण्यात आलेला आह़े कृषी विभागाकडे 536 पैकी 295 तर जिल्हा पुरवठा विभागाकड सर्व 990 रेशन दुकानांसाठी हे मशीन उपलब्ध झालेले आहेत. ते कशापद्धतीने हाताळायचे याबाबत लवकरच रेशन दुकानदारांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांचे रेशन दुकानदारांना वाटप करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली़ या मशिनच्या वापराने काळा बाजाराला आळा बसणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
कृषी विभागाची स्थिती
जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांकडून शेतक:यांना योग्य त्या प्रमाणात खते, बियाणे मिळतात का यासाठी वेळोवेळी तपासणी करताना मोठी अडचण होत होती़ पण ही अडचण आता दूर होण्यास पीओएस मशीन अर्थात पॉईंट ऑफ सेल्सद्वारे मोठी मदत होणार आह़े
राज्याच्या कृषी आयुक्तालयाकडून जिल्ह्याच्या पातळीवर 536 कृषी सेवा केंद्रासाठी मशीन उपलब्ध होणार आहेत़ पैकी पहिल्या टप्प्यात 295 मशीन जिल्ह्यात दाखल झालेले आहेत़ उर्वरित 241 मशीन लवकरच कृषी सेवा केंद्रार्पयत पोहचणार आहेत़ या मशिन पुरवठय़ासाठी काही खासगी कंपन्यांची मदत घेण्यात आली आहे.
अनुदान मिळणार
जिल्ह्यात कृषी सेवा केंद्रामार्फत खतांचा पुरवठा होत असताना केवळ अनुदानित खतांसाठी या मशीनचा उपयोग होणार आह़े शासनाकडून जे अनुदान मिळेल ते थेट विक्रेत्यांच्या बँक खात्यात जमा होणार आह़े
ऑनलाइन असणार प्रक्रिया
पहिल्यांदाच पीओएससारख्या मशीनचा उपयोग जिल्ह्याच्या पातळीवर होणार आह़े कृषी सेवा केंद्रात खते घेण्यासाठी येणा:या शेतक:यांचा आधार क्रमांक संलगA केला जाणार आह़े
शिवाय त्या शेतक:यांच्या अंगठय़ाचा ठसादेखील घेतला जाणार असल्यामुळे त्याच शेतक:यार्पयत खतांचा पुरवठा करणे कृषी केंद्राला सोपे होणार आह़े आधार कार्डशी संलगA असल्यामुळे आणि सर्व प्रक्रिया ऑनलाइन असल्यामुळे योग्य त्या लाभार्थ्ीर्पयत योजनेचा लाभ मिळणार आह़े