लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : धुळयातील एकेकाळचे ख्यातनाम फौजदारी वकील शंकरराव देव यांनी समर्थ रामदास स्वामींच्या मंदीर उभारणीत पुढाकार घेऊन श्री समर्थ वाग्देवता मंदिराची स्थापना केली़ येथील ग्रंथालयाला प्राचीन ग्रंथसंपदेचा वारसा लाभल्याने परदेशासह भारतातील भावी डॉक्टरांनी धुळ्यातून पीएचडीचा अभ्यास केल्याची नोंद संस्थेत आहे़मोडी, हिंदी, संस्कृत, अरबी भाषेतील संदर्भ ग्रंथ धुळ्यात नानासाहेब देव यांच्या संशोधनातून असंख्य मोडी कागदपत्रे या ठिकाणी अस्तित्वात आहेत़ येथील २ हजार मोडी कागदपत्रांचे मोडी लिप्यंतराचे काम पूर्ण झाले आहे़ संस्कृत, मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराथी, अर्धमागधी, चरित्र, आत्मचरित्र, कथा कांदबºया, नाटक, प्रवास वर्णने, एकांकिका, बालसाहित्य, महाभारत, श्रीभागवत, रामायण, दासबोध, वेद, पुराणे, उपनिषद, आरोग्य, तत्वज्ञान, ज्योतिष, आयुर्वेद अशी विविध विषयांचे १३ हजार २२३ पृष्ठांच्या १७३ ग्रंथाचे प्रकाशन देखील झाले आहे़ प्राचीन ग्रंथसंपदा असलेले उत्तर महाराष्ट्रात एकमेव अभ्यासकेंद्र समर्थ वाग्देवता मंदिरात प्राचीन ग्रंथ संपदा असल्याने आतापर्यत नागपूर, पूणे, धुळे, औरंगाबाद, जालना, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठासह परदेशातील अभ्यासकांनी येथील साहित्यावर अभ्यास करून पीएचडी पूर्ण केली आहे़ येथे सुमारे १०० ते ६०० वर्षांपूर्वीची कागदपत्रे, ऐतिहासिक दस्तावेज अभ्यासकांना उपयोगी पडणारे आहेत़ पीएच.डी. मिळालेल्या अभ्यासकांचे अनेक शोधनिबंध गं्रथालयात उपलब्ध आहेत़ चार हजार ग्रंथातील बहूविध विषयांवर संशोधनशिवकालीन व समर्थकालीन हस्ताक्षरांचे नमुने व ग्रंथ संग्रहांसोबत प्रतापगडाच्या देवीचे शिक्के उतरविलेला कागद, बोटाच्या चिमटीत मावतील एवढ्या आकाराच्या दोन सुवाच्य भगवद्गीता, दोन ताम्रपट, एकाच कागदावर मावतील असे २०५ मनाचे श्लोक, श्रीसमर्थ शिष्य-प्रशिष्य-सांप्रदायिक अशा लहानथोर ग्रंथकारांचे विविध भाषांमधील ग्रंथ, अनेक बखरी, त्याशिवाय व्याकरण, संगीत, रागदारी, जमाखर्च, गणित, मंत्रतंत्र, आयुर्वेद, व्रतवैकल्ये, ज्योतिष, संगीत, यंत्रे, शिक्के-मुद्रा, मजकूर-आकार, तुलसी रामायण, ऐतिहासिक दस्तावेज अशा अंदाजे ३ हजार २०० च्या आसपास ग्रंथातील बहूविध विषयांवर विद्यार्थ्यांनी अभ्यास करून शोधप्रबंध सादर केले आहेत.सुंदरकांड ग्रंथ अभ्याकांना उपयोगी पडणारा-नकाणेकररामायण ग्रंथ संस्कृत भाषेतील आहे़ नानासाहेब देव यांनी मराठी भाषेचा आधार घेऊन बाळकांड, अयोध्याकांड हे ग्रंथ प्रकाशन केले़ सध्या सुंदरकांड या गं्रथाचे लिखान सुरू आहे़ या ग्रंथाला जागतिक स्थरावरील दर्जा मिळण्याचा मानस संस्थेचा आहे़ भाविष्यात अभ्यासकांना या ग्रंथांचा फायदा होणार आहे़
परदेशासह भारतातील भावी डॉक्टरांचा धुळ्यातून अभ्यास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 9:35 PM