धुळे : धुळ्यात गुरुवारी दुपारी झालेल्या बेमोसमी पावसाने चांगलेच झोडपून काढले़ विजेचे खांब वाकले तर शाळेचे पत्रे देखील उडाले़ बाजार समितीत मात्र कांदा आणि मका यांचे नुकसान झाल्याने व्यापाऱ्यांना सुमारे १५ लाखांचा फटका सहन करावा लागला आहे़गुरुवारी सकाळपासूनच वातावरणात गारवा निर्माण झाला होता़ पाऊस येईल असे वाटत नसताना अचानक दुपारी ढग भरुन आले़ बेमोसमी पावसाने वादळीवाºयासह धुळेकरांना चांगलेच झोडपून काढले़बाजार समितीत दाखल झालेला २ ते अडीच क्विंटल मका पावसात भिजल्याने खराब झाला़ सध्या मक्याचा भाव १ हजार ७०० ते १ हजार ८०० रुपयांपर्यंत आहे़ अंदाजे ७ ते ८ लाखांचे नुकसान झाले आहे़ तसेच बाजार समितीत कांदा देखील मोठ्या प्रमाणावर आलेला आहे़ पावसात २ हजार क्विंटल कांदा भिजल्याने लाखों रुपयांचे नुकसान झाले़ सध्या कांद्याचा ३ हजार ५०० ते ७ हजार क्विंटलच्या दराप्रमाणे भाव आहेत़ कांदा आणि मका मिळून सुमारे १५ लाखांचे नुकसान झाले आहे़तसेच वादळीवारा असल्यामुळे शहरातील बहुतांश ठिकाणी विजेचे खांब वाकले आहेत़ कुठे विद्युत तारा तुटल्याने विजेचा लंपडाव सुरु होता़ याशिवाय जे खांब वाकले आहेत, ते सरळ करण्याचे काम शुक्रवारी मालेगाव रोडवर सुरु होते़
अवकाळी पावसाचा व्यापाऱ्यांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 11:56 AM