चंद्रकांत सोनार ।‘कोरोना सारख्या महाभंयकर विषाणूचा सामाना संपूर्ण जगाला करावा लागत आहे़ त्यासाठी प्रत्येकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे़ विशेषता या काळात शुशना जन्म देणाऱ्या व गरोदर असलेल्या मातांनी शक्यतोवर घरातच राहण्याची गरज आहे़ कारण कोरोना सारखा विषाणूची लागण होण्याची शक्यता अधिक असते़ असा सल्ला मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ़ चंद्रकला मोरे यांनी ‘लोकमत’ शी बोलतांना दिला ़प्रश्न : गरोदर मातांनी कोरोनाच्या काळात काय काळजी घ्यावी?उत्तर : कोरोना हा संसर्गजन्य विषाणू आहे़ विषाणूची लागण मानवी शरीराव झाल्यास शरीराची रोगप्रतिकार शक्ती कमी होते़ त्यामुळे गरोदर अवस्था व नवजात बालकाची काळजी घेणे महत्वाचे आहे़ गरोदर काळात सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे, तोडाला मास्क लावल्याशिवाय बाहेर जावू नये, वेळोवेळी हाताला सॅनिटायझर लावावे, पाले भाज्या धुवून घ्याव्यात़प्रश्न : गरोदर मातांनी रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी काय करावे?उत्तर : कोरोना संकटाच्या काळात रोगप्रतिकार शक्ती टिकवून ठेवणे महत्वाचे आहे़ त्यासाठी गरोदर मातांनी फळे, लिंबू, गावराणी तूप, अंडे, सर्व प्रकारच्या पाले भाज्या, डाळी, वरण भात, मासे तसेच रोज ५० ग्रॅम खजूर आहार घ्यावा़ यामुळे बाळ व आईचे वजन वाढू रोग प्रतिकार शक्ती वाढते़प्रश्न : गरोदर मातांना नियमित तपासणी आवश्यक आहे का?उत्तर : कोरोनाचा धोका टाळण्यासाठी शक्यतो़, घराबाहेर पळू नये, मात्र त्रास अधिक होत असेल तर दुर्लक्ष करू नका, दवाखान्यात जातांना सोशल डिस्टंन्स ठेवावा व डॉक्टरांच्या सल्लांने औषधी नियमित घेणे गरजेचे आहे़बाळाच्या हालचालीवर लक्ष असू द्याकोरोना संकटाला सर्वाना सामोरे जावे लागत आहे़ त्यामुळे दीड महिन्यापासून लॉकडाऊन असल्याने मनात नकारात्मक विचार येवू शकतात़ मात्र त्याचा परिणाम गरोदर मातांनी व आपल्या बळावर पडू देऊ नये़ यासाठी गर्भ संस्काराचे पुस्तकांचे वाचण करून मनात सकारात्मक विचार ठेवण्याची गरज आहे़घाबरून नका, मात्र काळजी घ्याआवश्यक ती औषधे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. हायड्रोक्लोरोक्वीन पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. कोरोनाची लस अद्याप तयार झालेली नाही मात्र उपलब्ध औषधांच्या माध्यमातून कोरोनाला हरवता येऊ शकते. कोरोना झाला म्हणून घाबरून जाऊ नये. काळजी घेऊन कोरोनाला हरवले जाऊ शकते.सध्याच्या काळात मनात सकारात्मक विचार ठेवून जीवनाची वाटचाल करा - डॉ़ चंद्रकला मोरे
गरोदर मातांना विषाणूचा संसर्ग होऊ शकतो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 9:13 PM