आॅनलाइन लोकमतधुळे : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचा १ मे रोजी निकाल जाहीर होऊन शाळांना सुट्या लागल्या तरी २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी सुट्यांचे नियोजन केलेच नाही, अशी तक्रार जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीने केलेली आहे.उन्हाळ्याची व दिवाळीच्या सुटीत सुसूत्रता राहावी म्हणून शिक्षण संचालनालयामार्फत दरवर्षी सुट्यांची निश्चिती करण्यात येत असते.शाळांच्या सुट्यांचे नियोजन व त्यामध्ये बदल करण्याचा निर्णय पालक-शिक्षक संघाच्या बैठकीत मान्य केला जावा. या अटीचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता संबंधित जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी घ्यावी असे शासनाचे उपसचिव रा.ग. गुंजाळ यांनी पाठविलेल्या पत्रात नमूद केले होते. मात्र त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले असे समितीचे म्हणणे आहे.माध्यमिक विभागातर्फे सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी शिक्षक संघटनांची बैठक घेऊन वर्षभरातील सुट्यांचे नियोजन करण्यात आले. माध्यमिक विभागाचे नियोजन झाल्यानंतर प्राथमिक विभागाचे सुट्यांचे नियोजन करण्यात येईल अशी प्राथमिक विभागातील शिक्षक संघटनांना वाटत होते. मात्र जिल्हा परिषदेच्या शाळांना सुट्या लागल्या तरी प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकाºयांनी सुट्यांच्या नियोजनासाठी बैठकच बोलविली नाही, असे प्राथमिक शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील यांचे म्हणणे आहे.त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, या संदर्भात जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीने प्राथमिक शिक्षणाधिकाºयांची लेखी तक्रार करूनही त्यांचा मनमानी कारभार सुरूच आहे. अशा शिक्षणाधिकाºयांची उचलबांगडी करून शिक्षकांना योग्य न्याय द्यावा अशी मागणी जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील, सरचिटणीस बापू पारधी यांनी केली आहे.
धुळे जिल्ह्यात प्राथमिक विभागाचे सुट्यांचे नियोजन झालेच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2019 11:45 AM
जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीची तक्रार
ठळक मुद्देनिकालापूर्वी सुट्यांचे नियोजन करणे गरजेचे होतेप्राथमिक शिक्षणाधिकाºयांनी बैठकच बोलविली नाहीशिक्षक संघटनांनी व्यक्त केली नाराजी