गेल्या वर्षभरापासून शासनाच्या नियमाप्रमाणे शिक्षकवर्ग कोरोनासंदर्भात कामे करीत आहेत. दरम्यान, कोरोनाची दुसरी लाट अतिशय भयानक आहे. या लाटेत धुळे तालुक्यातील काही शिक्षक रजेवर गेले, तर काही शिक्षिकांनी प्रसूतीसाठी १ ते ३० एप्रिल २०२१ या कालावधीत रजा घेतलेल्या आहेत.
कोरोनामुळे शिक्षकवर्ग अगोदरच आर्थिक अडचणीत आहे. अशा कठीण प्रसंगात शिक्षकांचे पगार कपात न करता त्यांची रजा मंजूर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील, सरचिटणीस बापू पारधी, धुळे तालुकाध्यक्ष प्रभाकर रायते यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
...तर उपोषण करणार
प्राथमिक शिक्षकांचे पगार कपात करू नये, असे निवेदन देण्यात आलेले आहे. यावरही धुळे पंचायत समितीने रजेवर गेलेल्या कर्मचाऱ्यांचा एप्रिल महिन्याचा पगार कपात केल्यास उपोषण केले जाईल, असा इशारा संघटनेचे राजेंद्र पाटील यांनी दिला आहे.