लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : विविध विकास कामांचे भूमीपूजन करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी धुळ्यात शनिवारी दुपारी येणार असल्याची माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे यांनी पत्रकार परिषदेत दिली़ डॉ़ भामरे यांच्यासमवेत महापौर चंद्रकांत सोनार, उपमहापौर कल्याणी अंपळकर, शितल नवले, डॉ़ माधुरी बाफना, विनोद मोराणकर, हिरामण गवळी, प्रदीप कर्पे, विजय पाच्छापूरकर यांच्यासह अन्य उपस्थित होते़ डॉ़ भामरे म्हणाले, मनमाड - मालेगाव - धुळे - इंदूर रेल्वेमार्गासह सुलवाडे - जामफळ - कनोली उपसा सिंचन योजनेचे भूमिपूजन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी धुळ्यात शनिवारी दुपारी येणार आहेत़ त्यांच्यासमवेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत़ त्यांच्या उपस्थितीत मालेगाव रोडवरील गो-शाळेच्या मैदानावर सभा होणार असल्याने नागरीकांनी उपस्थित रहावे असेही आवाहन डॉ़ भामरे यांनी केले़
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी धुळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 1:14 PM