धुळे : गेल्या वर्षी जोरदार पर्जन्यवृष्टी झाली़ त्यात गणपती पुलाचे कठडे तुटल्याने वाहून गेले होते़ पुलाच्या दुरुस्तीसह कठड्यांचेही काम सुरु असताना अचानक कोरोनाचा प्रादुर्भाव जाणवू लागल्याने काम थांबविण्यात आले होते़ गेल्या दोन दिवसांपासून या कामाला सुरुवात झाली आहे़गेल्या वर्षी साक्री तालुक्यातील पश्चिम पट्यात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली होती़ एरव्ही कोरडेठाक असलेले लहान मोठी धरणे, तलाव ओसंडून वाहताना दिसून आली़ साक्री तालुक्यातील सर्वच मोठी धरणे ओसंडल्यामुळे सर्व अतिरिक्त पाणी पांझरा नदीत येवून मिळाले होते़ परिणामी कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणावर पांझरेला पूर आला होता़ या पुरात धुळे शहरातील गणपती पुल आणि लहान पुलाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते़ सुरुवातीला लहान पुलांच्या कठड्यांचे काम मार्गी लावल्यानंतर आता गणपती पुलावरील कठड्यांच्या दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आलेले आहे़
गणपती पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला प्राधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 10:35 PM