शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न करणा-या धर्मा पाटील यांच्या कुटुंबियांची पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2018 11:35 AM

संपादित जमिनीचा योग्य मोबदला न मिळाल्याने मागणी करुनही वारंवार दुर्लक्ष केल्याने मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या धर्मा पाटील यांच्या कुटुंबियांची माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भेट घेतली

धुळे - संपादित जमिनीचा योग्य मोबदला न मिळाल्याने मागणी करुनही वारंवार दुर्लक्ष केल्याने मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या धर्मा पाटील यांच्या कुटुंबियांची माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भेट घेतली. शिंदखेडा तालुक्यातील विखरण येथील त्यांच्या घरी पृथ्वीराज चव्हाण पोहोचले होते. यावेळी त्यांच्यासोबत बाळासाहेब थोरात, खासदार रजनी पाटील, माजी मंत्री हेमंत देशमुख, काँग्रे चे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर उपस्थित होते. पृथ्वीराज चव्हाण यांनी धर्मा पाटील यांच्या कुटुंबियांशी चर्चा करुन प्रकरणाची पुर्ण माहिती घेतली. 

पाच एकरच्या बदल्यात केवळ चार लाखाचा मोबदला औष्णिक वीज प्रकल्पासाठी वीज निर्मिती करणाऱ्या यंत्रणेने देऊ केला. मात्र हा मोबदला योग्य नसल्यानं वीज प्रकल्पासाठी जमीन संपादित करणा-या यंत्रणेकडून दुजाभाव झाल्याचा आरोप करीत धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विखरण येथील ८० वर्षीय धर्मा पाटील या शेतक-यानं सोमवारी मंत्रालयात विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.त्यांच्यावर मुंबईत सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये अती दक्षता विभागात उपचार सुरू आहेत. धर्मा पाटील यांच्या चार एकर शेतात ६००आंब्याची झाड लागवड केल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितलं. शेतात विहीरदेखील आहे.या प्रकल्पासाठी ५२९ हेक्टर जमीन संपादित करण्यात आलीय.

काय आहे प्रकरण -सोमवारी एका 80 वर्षीय धर्मा पाटील यांनी मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न केला. संपादित जमिनीच्या योग्य मोबदल्यासाठी गेली अनेक दिवस मंत्रालयात चकरा मारल्या पण तरीही योग्य  दाद मिळत नसल्याने हतबल धर्मा पाटील यांनी मंत्रालयातच आत्महत्येचा प्रयत्न केला. धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील असं या वृद्ध शेतकऱ्याचं नाव असून त्यांची प्रकृती सध्या गंभीर असल्याचं समजतं आहे. 

धुळे जिल्ह्यात होणाऱ्या औष्णिक वीज प्रकल्पात त्यांची पाच एकर जमीन संपादित करण्यात आली होती. मात्र पाच एकराच्या बदल्यात त्यांना फक्त चार लाख रुपये भरपाई देण्यात आली. इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत भरपाई कमी मिळाल्याबाबत धर्मा पाटील यांनी गेल्या तीन महिन्यांपासून पाठपुरावा सुरू केला. मात्र त्यांना अधिकारी आणि संबंधित मंत्रालयाकडून योग्य उत्तर मिळत नसल्याने त्यांनी विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. 

सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये धर्मा पाटील यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. उपचार घेत असलेल्या धर्मा पाटील यांना धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावल वगळता कुणीही भेटण्यासाठी गेलेलं नाही, किंवा त्यांची साधी विचारपूसही करण्यात आलेली नाही, असा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.

धर्मा पाटील यांच्या चार एकर जमिनीत आंब्याची 600 झाडं होती. विहीर, ठिबक सिंचन आणि वीज अशी बागायती शेती असलेल्या धर्मा पाटील यांना केवळ 4 लाखांचा मोबदला देण्यात आला. तर दुसऱ्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यात आला आहे. योग्य मोबदल्यासाठी धर्मा पाटील गेल्या तीन महिन्यांपासून मंत्रालयाचे उंबरे झिजवत आहेत. मात्र त्यांना कुणीही प्रतिसाद देत नसल्याने हतबलतेतून त्यांनी अखेर स्वतःला संपवण्याच प्रयत्न केला.  

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाण