दोंडाईचात आज दोन्ही महापुरुषांच्या पुतळ्यांना आमदार जयकुमार रावल व नगराध्यक्षा नयनकुवर रावल यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
अमरावती नदी काठावरील शिवबाबा मंदिरापासून मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणुकीचा समारोप राममंदिराजवळ झाला. उंट आणि घोड्यांचा ताफा, ढोल-ताशांचा गजर, आदिवासींचे लोकनृत्य, लेझीमचा ताल, गुलाल तसेच फुलांची उधळण अशा पारंपरिक मिरवणुकीने लक्ष वेधून घेतले होते. आमदार जयकुमार रावल व माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष महावीर रावल घोड्यावर विराजमान होते. शिवमावळा प्रतिष्ठान व ग्रुपमार्फत प्रसाद वाटप करण्यात आला.
मिरवणुकीत स्मारक समितीच्या मार्गदर्शक नगराध्यक्षा नयनकुवर रावल, समितीचे अध्यक्ष आमदार जयकुमार रावल, समन्वयक विजय मराठे, सदस्य भाजप अध्यक्ष प्रवीण महाजन, बाजार समिती चेअरमन नारायण पाटील, कामराज निकम, नगरसेवक रवींद्र उपाध्ये, बांधकाम सभापती निखिल जाधव, नगरसेवक चिरंजीवी चौधरी, जितेंद्र गिरासे, सामाजिक कार्यकर्ते कृष्णा नगराळे, ईश्वर धनगर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष महावीरसिंह रावल, प्रफुल्ल साळुंखे, राकेश अग्रवाल, भरतरी ठाकूर, नरेंद्र राजपूत, हितेंद्र महाले, कुलदीप गिरासे आदींसह सर्व नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, विविध सोशल क्लबचे सदस्य यांच्यासह हजाराेंचा जनसुमदाय मिरणुकीत सहभागी झाला होता.