कोरोनाकाळात जिल्ह्यात रक्ताचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला होता. रमेश मिसाळ यांनी दोन रक्तदान शिबिरे आयोजित करून स्वतः रक्तदान तर केलेच मात्र इतरांना देखील रक्तदान करण्यास सांगून त्यांनी रक्ताची असणारी टंचाई दूर केली. एवढेच नव्हे तर लाॅकडाऊन काळात ते नाशिकहून धुळ्याला येत असताना एक दाम्पत्य पायी प्रवास करत धुळ्याला येत होते. त्यांच्यातील एकजण आजारी होता. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता आपल्या खाजगी वाहनात बसवून त्या जोडप्यास थेट धुळ्यापर्यंत आणून सोडले. अशा माणुसकी जोपासणाऱ्या अधिकाऱ्याचा सत्कार केल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाने दिली.
मराठा समाजाचे नेते सुधाकर बेंद्रे, साहेबराव देसाई, शिवसेनेचे सहसंपर्क नेते अतुल सोनवणे, कार्याध्यक्ष प्रदीप जाधव, संदीप पाटोळे, छावा संघटनेचे विभागीय सचिव आबा कदम, मराठा क्रांती मोर्चाचे सचिव निंबा मराठे, सहखजिनदार वीरेंद्र मोरे, संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष हेमंत भडक, महानगरप्रमुख श्याम निरगुडे, जिल्हा संघटक अमर फरताडे, विनोद जगताप, शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख संदीप चव्हाण, देवपूर शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख शेखर वाघ, रवींद्र शिंदे, गणेश पवार, विराज रावळे आदी उपस्थित होते.