शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

निदर्शने, थाळीनाद करत शासनाचा निषेध

By admin | Published: January 09, 2017 11:27 PM

नोटाबंदीला विरोध : कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीच्या पदाधिका:यांनी केलेल्या घोषणाबाजीने परिसर दणाणला

धुळे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेतला. या निर्णयाला दोन महिने पूर्ण झाले असले तरी  सर्वसामान्यांचा त्रास कमी झालेला नाही. त्याविरोधात सोमवारी जिल्हाभरात कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीतर्फे निदर्शने, रास्ता रोको आंदोलन करून शासनाचा निषेध करण्यात आला. या वेळी पदाधिका:यांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे परिसर दणाणला होता. राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीतर्फे ‘धरणे’जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी पदाधिका:यांनी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे, की नोटाबंदीच्या निर्णयाला सुरुवातीला राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीने पाठिंबा दिला होता. परंतु, आता दोन महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतरही परिस्थितीत बदल झालेला नाही. दररोज नवनवीन घोषणा होत आहेत. परिणामी, सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या निर्णयामुळे अनेकांना कामावरून कमी करून टाकण्यात आले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. वास्तविक, पंतप्रधान मोदी यांनी 50 दिवसांनंतर भ्रष्टाचार, दहशतवाद मुक्त व काळा पैसा मुक्त देश होईल, अशी घोषणा केली होती. परंतु, अद्याप तरी ही घोषणा पूर्ण झालेली नसल्यामुळे हे आंदोलन केल्याचे निवेदनात म्हटले                 आहे.  या वेळी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष मनोज मोरे, महिला जिल्हाध्यक्षा जयश्री अहिरराव, महापौर कल्पना महाले, उपमहापौर उमेर अन्सारी, मीनल पाटील,  सभागृह नेते कमलेश देवरे, नाशिकस्थित म्हाडाचे सभापती किरण शिंदे, जि.प. सदस्य किरण पाटील, राष्ट्रीय सेवा दलाचे अध्यक्ष नंदू ऐलमामे, संजय वाल्हे, अंकुश देवरे, चित्तरंजन कुलकर्णी, राष्ट्रीय सेवा दलाचे अध्यक्ष नंदू येलमामे व इतर पदाधिकारी  उपस्थित होते. कॉँग्रेसच्या महिला पदाधिका:यांनी तहसील कार्यालयासमोर सकाळी अर्धा तास थाळीनाद आंदोलन केले. यानंतर  तहसील कार्यालयापासून मोर्चा काढत तो जिल्हाधिकारी कार्यालयावर आणला. तेथे निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे यांना निवेदन देण्यात आले.  या वेळी धुळे शहर महिला कॉँग्रेसच्या अध्यक्षा तथा नगरसेविका योगीता पवार, गायत्री जयस्वाल, नाजमिन शेख, शोभा जाधव, संगीता देसले, विमलताई बेडसे, प्रभादेवी परदेशी, वासंतीबेन यादव, संध्याताई चौधरी, रोशन पिंजारी, निर्मला पाटील, सुमन मराठे, नीलेश काटे, युवराज करनकाळ, रमेश श्रीखंडे, साबिर शेख, जावेद शाह, मोहसीन तांबोळी, राहुल काटे, हर्षल पाटील, राहुल काटे, महेश कालेवार व महिला कार्यकर्ते उपस्थित होते. नोटाबंदीच्या निर्णयानंतर दोन महिने झाली तरी सर्वसामान्यांना त्रास होत असल्यामुळे कार्यकत्र्यानी नाराजी व्यक्त केली.