लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : कोलकता येथील एन.आर.एस.मेडीकल कॉलेजमधील डॉ. परिबाह मुखर्जी यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्याचा इंडियन मेडीकल असोसिएशनच्या धुळे शाखेतर्फे काळ्याफिती लावून निषेध करण्यात आला. तसेच कोलकता महाविद्यालयातील डॉक्टरांनी पुकारलेल्या संपाला पाठिंबा दिला.आयएमएच्या धुळे शाखेतर्फे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना आज निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही वर्षात डॉक्टरांवर होणारे हल्ले वाढत चालले आहे. हल्यांपासून खाजगी तसेच सरकारी हॉस्पिटलही सुटलेले नाही. कोलकता येथे एका ८५ वर्षाच्या वृद्धाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतरही रूग्ण दगावला. त्या बदलाचा राग म्हणून जमावाने एन.आर.एस.मेडीकल कॉलेजमधील डॉ. परिबाह मुखर्जी यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून, े मृत्यूशी झुंज देत आहेत. या हल्याचा आय.एम.ए.च्या धुळे शाखेतर्फे निषेध करून कोलकता येथील महाविद्यालयातील डॉक्टरांनी पुकारलेल्या बंदला पाठींबा दिला आहे. दरम्यान २०१० मध्ये पारीत झालेला डॉक्टर संरक्षण कायदा प्रभावीपणे अंमललात आणावा अशी डॉक्टरांनी मागणी केली. तसेच वर्ष २०१६ मध्ये निवासी वैद्यकीय अधिकारी यांच्या सुरक्षेसंदर्भात सरकारने दिलेल्या आश्वासनाची आजपर्यंत पूर्तता केली नाही. ती पूर्तता करावी अशी मागणी केली. दरम्यान आयएमएतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह खासदार, आमदार यांना पत्र,ई-मेल पाठवून या घटनेचा निषेध केला आहे.निषेध करतेवेळी आय.एम.ए.चे अध्यक्ष डॉ. राजकुमार सूर्यवंशी, डॉ. योगेश ठाकरे, डॉ. सुशील महाजन, डॉ. जया दिघे, डॉ. विशाल पाटील आदी उपस्थित होते.
डॉक्टरांवरील हल्ल्याचा ‘आयएमए’तर्फे निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 10:02 PM