शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
2
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 
3
अदानी समूहावर आरोप म्हणजे भारताचा विकासरथ रोखण्याचं षडयंत्र; महेश जेठमलानी बचावासाठी मैदानात
4
२८ चेंडूत १०० धावा! IPL मधील Unsold गड्यानं फास्टर सेंच्युरीसह मोडला रिषभ पंतचा रेकॉर्ड
5
‘इस्कॉन कट्टरतावादी संघटना’, बांगलादेशमधील युनूस सरकारकडून बंदी घालण्याची तयारी  
6
"बाळा, मीच तुझी मम्मा..."; मेकअप केलेल्या आईला ओळखू शकला नाही लेक, ढसाढसा रडला
7
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
8
धक्कादायक! महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात एका बूथवरील मतमोजणी झालीच नाही
9
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
10
लग्नाचं आमिष दाखवून केलं शोषण, 'पुष्पा 2'मधील अभिनेत्याविरोधात FIR दाखल
11
'बांगलादेशच्या स्वातंत्र्याला धोका...', चिन्मय दास यांच्या अटकेनंतर भारताची तीव्र प्रतिक्रिया; बांगलादेश म्हणाला...
12
मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच उत्तर मिळेल; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
13
काय आहे 'वन नेशन, वन सबस्क्रिप्शन' योजना, कोणाला होणार फायदा?
14
IPL Auction 2025: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ बड्या खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला..!!
15
Enviro Infra Engineers IPO Allotment : एन्व्हायरो इन्फ्रा IPO चं अलॉटमेंट झालीये का? कसं चेक कराल, जाणून घ्या 
16
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
17
६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट
18
'सर्वात मोठा पक्ष कोणताही असेल, मुख्यमंत्री तुम्हीच होणार'; निवडणुकीपूर्वी भाजपाने शिंदे शिवसेनेला शब्द दिलेला?
19
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
20
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"

धुळ्यात वकील संघाच्या अध्यक्षांविरोधात खोटा गुन्हा दाखल केल्याने आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2019 7:11 PM

२० मे पर्यंतची मुदत : पोलिसांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : खोटे गुन्हे दाखल करणारा आणि खोटे गुन्हे दाखल करुन घेणारे यांच्या विरोधात योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन मिळाल्यानंतर धुळे जिल्हा वकील संघाने पुकारलेले आंदोलन अखेर मागे घेण्यात आले़ २० मे पर्यंत कारवाई न झाल्यास पुन्हा आंदोलन पुकारले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला़ वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड़ दिलीप पाटील आणि अन्य वकीलांविरोधात खोटा गुन्हा दाखल केल्याने आंदोलन छेडण्यात आले़ कायद्यातील तरतुदींचा दुरुपयोग करुन काही ठराविक वकीलांविरोधात खोटा गुन्हा दाखल करणाºया अनिल गंजीधर पवार यास हद्दपार करावे तसेच गुन्हा नोंदवून घेणारे शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक गणेश चौधरी यांना निलंबित करावे, अशी मागणी करीत धुळे वकील संघाच्यावतीने न्यायालय आवाराच्या बाहेर रास्तारोको आंदोलन करण्यात आले़ यावेळी धुळे जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड़ दिलीप पाटील आणि सर्व पदाधिकारी आणि वकील उपस्थित होते़ याप्रसंगी वकील संघाने निषेध सभा देखील घेतली़ यानंतर वकील अधिकच आक्रमक झाले होते़ रास्ता रोको आंदोलनामुळे मालेगावकडून येणाºया आणि जाणाºया वाहनांचा मार्ग वळविण्यात आला होता़ वकील संघाचे निवेदनपोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की अनिल पवार हा जिल्हा परिषदेतील बडतर्फ कर्मचारी असून त्याने आजपर्यंत शहरातील अनेक लोकांविरुध्द धुळे न्यायालयात तसेच वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे नोंदविलेले आहेत़ पवार याने खोट्या तक्रारी करुन लोकांमध्ये भानगडी लावण्याचे उद्योग केले आहेत़ परिणामी शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात येण्याची भीती आहे़ धुळे न्यायालयातील वकील संजय बाविस्कर हे २० एप्रिल रोजी न्यायालयीन कामकाज करीत असताना पवार याने त्यांना मारहाण केल्याने शहर पोलीस ठाण्यात पवार विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ यानंतर पवार याने उपोषणाची धमकी देवून वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड़ दिलीप पाटील यांच्यासह अन्य वकीलांविरोधात मंगळवारी भादंवि कलम १४३, १४७, ३२३ अन्वये खोटा गुन्हा दाखल करण्यास पोलिसांना भाग पाडले़ ंविशेष म्हणजे गुन्हा दाखल करण्यापुर्वी पोलीस निरीक्षक गणेश चौधरी यांनी कुठलिही शहानिशा केली नाही़ कायद्याचा गैरवापर करुन पवार याच्याकडून लोकांना त्रास देणे सुरु असल्यामुळे अशा व्यक्तीला तातडीने जिल्ह्यातून हद्दपार करावे, तसेच संबंधित पोलीस अधिकाºयाविरोधात निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली़ पोलीस अधिकाºयांची भेटवकीलांना रास्तारोको आंदोलन केल्यानंतर वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले होते़ त्यामुळे अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भुजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील आंदोलनस्थळी दाखल झाले़ त्यांनी वकीलांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर २० मे पर्यंत कारवाईचे आश्वासन दिले़ परिणामी सुरु असलेले आंदोलन तात्पुरता मागे घेण्यात आले़ 

टॅग्स :DhuleधुळेCourtन्यायालय