लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : कोरोनाच्या काळात वाईनची मागणी करणाºया ज्येष्ठ नागरिकांचा इतर ज्येष्ठ नागरिकांनी निषेध केला आहे़ आइसकॉमने ही मागणी केली होती़ त्यामुळे ज्येष्ठांची बदनामी झाल्याचा आरोप फेस्कॉमने केला आहे़महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ, फेस्कॉम खान्देश प्रादेशिक विभाग धुळे या संघटनेने प्रसिध्दीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कोरोनाचा संसर्ग वाढत असताना आणि धुळे शहरात संचारबंदी लागु असताना आइसकॉमचे उपाध्यक्ष व धुळे जिल्हा ज्येष्ठ नागरिक फेडरेशनचे अध्यक्ष व्ही़ के़ भदाणे यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी वाईनची मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले़ त्यात सहकाºयांच्या नावांचा उल्लेख करुन ज्येष्ठांना वाईन किती आवश्यक आहे; याचे अशोभनीय व न पटणारे निवेदन दिले आहे़ त्यामुळे ज्येष्ठांच्या वाईट प्रतिक्रीया समाजात दिसून आल्या आहेत़व्ही़ के़ भदाणे यांनी स्थापन केलेले धुळे जिल्हा ज्येष्ठ नागरिक फेडरेशन ही संघटना फेस्कॉमशी संलग्न नाही़ अशा प्रकारांना फेस्कॉम कधीही मान्यता देणार नाही़ त्यामुळे त्यांनी सर्व ज्येष्ठांना गृहीत धरु नये़ वाईनच्या मागणीमुळे ज्येष्ठांची बदनामी झाली आहे, असे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे़फेस्कॉम ही समाजाभिमुख संघटना आहे़ ती गेल्या चाळीस वर्षांपासून ज्येष्ठांसाठी विविध सकारात्मक व संघटनात्मक सर्वमान्य काम करीत आहे़ कोव्हीड १९ च्या संकटकाळात आर्थिक मदतही केली आहे़लॉकडाउनमुळे बेरोजगारीची कुºहाड कोसळलेल्या गरजूंना सहकार्य करण्याऐवजी वाईनची मागणी करणे म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना बदनाम करण्याचा प्रयत्न आहे़ या प्रकारामुळे ज्येष्ठांची प्रतिमा समाजात मलिन झाली आहे़ त्यामुळे फेस्कॉम संघटनेतर्फे या कृतीचा निषेध करण्यात येत आहे, असे पत्रक फेस्कॉम संघटनेचे अध्यक्ष एस़ बी़ बागड आणि सचिव प्राचार्य बी़ एऩ पाटील यानी प्रसिध्दीला दिले आहे़परवानाधारक ज्येष्ठ नागरिकांना वाईन उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी भदाणे यांनी केली होती़ त्यामुळे वाद निर्माण झाला आहे़
वाईनची मागणी करणाऱ्यांचा केला निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 9:51 PM