धुळे : जागतिक क्षयरोग दिनानिमित्त महापालिका आरोग्य विभागातर्फे सोमवारी सकाळी ११ वाजता जनजागृती सप्ताहाचे शुभारंभ जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्या हस्ते करण्यात आला़ यावेळी रॅलीव्दारे शहरात प्रबोधन करण्यात आले़यावेळी आयुक्त सुधाकर देशमुख, आरोग्य अधिकारी डॉ़सुधाकर मोरे, उपसंचालक डॉ़ मधुकर पवार, डॉ़ घोरपडे, डॉ़विशाल पाटील, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ़ मनिष पाटील, डॉ़ अनिल भामरे, डॉ़ जे़सी़पाटील, आदी उपस्थित होते़जादूगार रुबाब हैदर यांनी जादूच्या प्रयोगातून क्षय रोगाची लक्षणे निदान, उपचारपद्धती या विषयी माहिती दिली. या प्रसंगी रांगोळी स्पर्धा व निबंध स्पर्धेतील विजयी स्पर्धकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आले होते़शहरातील नागरिकामध्ये जनजागृती व्हावी म्हणून आॅटो शंभर रिक्षान मागे क्षयरोग जनजागृती होण्याच्या दृष्टीने जनजागृती बॅनर लावण्यात आले. तसेच जोरा सिटी हायस्कुल न्यु सिटी हायस्कुल व शासकीय परिचारिका प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांद्वारे शहरात जनजागृती रॅली काढण्यात आली होती. कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी राहूल रेखावार म्हणाले की, क्षयरोगाचे निवारण करण्यासाठी केवळ शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न किंवा सहभागी होऊन चालणार नाही़ त्यासाठी सर्व सर्व समाजातील घटकांनी क्षयरोग निर्मूलनासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे़यावेळी उपसंचालक राज्य क्षयरोग विभाग डॉ. मधुकर पवार यांनी क्षयरोगाची सद्यस्थिती व क्षयरोग निर्मुलनासाठी उपाय-योजना यावर मार्गदर्शन केले. समारंभाचे प्रस्ताविक आरोग्यधिकरी डॉ. बी. बी. माळी यांनी केले़सुत्रसंचलन वाहिद अली सैय्यद यांनी केले़ कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा क्षयरोग व शहर क्षयरोग केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यानी परिश्रम घेतले
पथनाट्यातून क्षयरोगाविषयी जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 11:11 PM