धुळे : स्वच्छता अभियान तसेच जलजन्य व कीटकजन्य आजारांना प्रतिबंधासाठी जनजागृती मोलाचे योगदान देण्याºया महापालिकेतील ११ कर्मचाºयांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त महापालिकेत सन्मानित करण्यात आले़महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त महापालिकेत महापौर चंद्रकांत सोनार यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले़ यावेळी आयुक्त सुधाकर देशमुख,उपमहापौर कल्याणी अंपळकर, स्थायी समिती सभापती युवराज पाटील, प्रभारी उपायुक्त शांताराम गोसावी, नगरसचिव मनोज वाघ यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते़जनजागृतीत यांचे योगदानडेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनीया या आजाराबाबत शहरात मोठ्या प्रमाणात जनजागृती सुरू आहे़ या मोहीम यशस्वीपणे कार्य करणाºया एसएफडब्ल्यु विलास व्यंकट चौधरी, मोहन आधार सुर्यवंशी, भटू भिमराव वाघ, भटू मंगा देवरे, हेमलता रामदास निकम तसेच कीटक समाहरक अशोक पिंगू कोठारी यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला़ यावेळी आयुक्त सुधाकर देशमुख यांनी मार्गदर्शन केले ़महापालिकेतर्फेयांचा झाला सन्मानस्वच्छ भारत अभियानात स्वच्छ सर्वेक्षणमध्ये उत्कृष्ट कार्य करणाºया स्वच्छता निरीक्षक राजेश मोहन वरावे, सुरेश राजाराम माळी, प्रमोद राजाराम चव्हाण, विकास मधुकर साळवे तसेच मुकादम अनिल दयाराम जावडेकर यांना महापौर चंद्रकांत सोनार यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले़
स्वच्छतेसह जनजागृती; कर्मचाऱ्यांचा झाला गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2019 10:17 PM