शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

शिंदखेड्यात रॅलीद्वारे जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2019 11:00 PM

मतदार नोंदणीसाठी केले आवाहन : शिक्षण संस्था, प्रशासनाचा पुढाकार

शिंदखेडा : मतदार नोंदणीबाबत जनजागृतीसाठी शनिवारी शहरात विद्यार्थ्यांची भव्य रॅली काढण्यात आली. तहसीलदार साहेबराव सोनवणे यांनी हिरवी झेंडी दाखविल्यानंतर या रॅलीस प्रारंभ झाला. रॅलीस शहरवासीयांतर्फे उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शहरातील श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे महाविद्यालय, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यास केंद्र आणि राज्यशास्त्र अभ्यास मंडळामार्फत सध्या सुरू असलेल्या मतदार नोंदणी मोहिमेसाठी हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला.याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य सी.व्ही. पाटील, रॅलीचे मुख्य आयोजक डॉ.संभाजी पाटील, उपप्राचार्य डॉ.बी.ए. पाटील, उपप्राचार्य एस.एस. देवकर, पर्यवेक्षक एस.टी. राऊळ, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.एस.के. जाधव, प्रा.आर. के. पवार, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ.आशा कांबळे, डॉ.व्ही.पी. राजपूत, प्रा.मुकेश पाटील, नरेंद्र भामरे, प्रा.आर.एन. पाटील आदि उपस्थित होते. आयोजक डॉ. पाटील यांनी सांगितले की, या वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा व विधानसभा यांच्या निवडणुकीत जास्तीत जास्त युवकांनी मतदान करावे, त्यासाठी त्यांच्यात मोठ्या प्रमाणात जागृती व्हावी यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले. उपप्राचार्य सी.व्ही. पाटील यांनी, लोकशाहीत मतदानाचे असलेले महत्त्व या विषयी मार्गदर्शन केले.तहसीलदार सोनवणे यांनी सांगितले की, युवक हे देशाचे आधारस्तंभ आहे. त्यांनी समाजात जाऊन मतदार नोंदणी उपक्रमाबाबत जनजागृती करावी. १ जानेवारी रोजी १८ वर्ष वय पूर्ण असलेल्या विद्यार्थ्यांनी आपली नावे मतदारयादीत नोंदवावीत तसेच जास्तीत जास्त मतदान करणे, हे यशस्वी लोकशाहीचे लक्षण आहे. त्यामुळे भारतीय लोकशाही जगात सर्वश्रेष्ठ असल्याचे त्यांनी सांगितले.ही रॅली शहरातील स्टेशन रोड, वरुळ चौफुली, भगवा चौक, बस स्टॅन्ड परिसर, वरपाडे चौफुली, स्टेट बँक परिसरातून काढण्यात आली. या रॅलीचा समारोप तहसील कार्यालय मैदानात झाला.त्याप्रसंगी_ वि अधिकारी, पी. एन दावळे, तलाठी एस.डी. बाविस्कर, तलाठी तुषार पवार, शिवाजी वाघ, पाटणचे प्रा. व्ही. एस. पवार, प्रा. जी.बी. बोरसे, डॉ. डी. जे. सोनवणे, प्रा.आर. आर. पाटील, प्रा. स्वप्नील गांगुर्डे आदि उपस्थित होते. रॅलीत सहभागी विद्यार्थ्यांनी घोषणा देऊन शहर परिसर दणाणून सोडला.ही रॅली कुलगुरु डॉ.पी.पी.पाटील, कुलगुरु डॉ.ई. वायुनंदन, विभागीय संचालक डॉ.धनजंय माने, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महाविद्यालयाचे अध्यक्ष प्रफुल्लकुमार सिसोदे, उपाध्यक्ष अशोक पाटील, प्राचार्य डॉ.बी.आर. चौधरी यांच्या मार्गदर्शनात काढण्यात आली.या रॅलीत बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्यासाठी भूषण बागुल, उगरावण्या पटले, वकील पाडवी, अमोल पवार, प्राध्यापक व कर्मचारी, महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी, स्वयंसेवक आणि विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.शहरातील नागरिकांचेही सहकार्य लाभले.

टॅग्स :Dhuleधुळे