आॅनलाइन लोकमतधुळे : नाफेडच्यावतीने यावर्षी ज्वारी, बाजरी, मका या भरडधान्याचे आॅनलाईन खरेदीसाठी धुळे जिल्ह्यात केंद्र सुरू करण्यात आले होते. साक्री वगळता उर्वरित तीन केंद्रावर ५११ शेतकºयांकडून १३ हजार १९३ क्विंटल ज्वारी व मक्याची खरेदी करण्यात आलेली आहे. तर एकाही केंद्रावर बाजरीची खरेदी झालेली नाही. केंद्र शासनाने निश्चित केल्यानुसार १ नोव्हेंबर १८ ते १५ जानेवारी १९ या कालावधीत ज्वारी, मक्याची या भरडधान्याची हमीभावाने खरेदी झाली. मक्याला १७०० रूपये तर ज्वारीला २४३० रूपये प्रतिक्विंटल भाव देण्यात आलेला होता. जिल्ह्यात चार केंद्रनाफेडतर्फे धुळे जिल्ह्यात धुळ्यासह शिरपूर, शिंदखेडा व साक्री येथे खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेली होती. ७३५ शेतकºयांनी केली नोंदणीभरडधान्य आॅनलाइन खरेदीसाठी तीन केंद्रावर ७३५ शेतकºयांनी नोंदणी केलेली होती. त्यात मका खरेदीसाठी ५८२ तर ज्वारी खरेदीसाठी १५३ शेतकºयांचा समावेश होता. त्यापैकी ५११ शेतकºयांकडून प्रत्यक्ष भरडधान्याची खरेदी करण्यात आली. त्यात मका ३६५ तर १४६ शेतकºयांकडून ज्वारीची खरेदी करण्यात आलेली आहे. १३ हजार १९३ क्विंटल धान्य खरेदीजिल्ह्यातील केंद्रावर एकूण १३ हजार १९३ भरडधान्याची खरेदी करण्यात आलेली आहे. यात मक्याची ९ हजार ५९४.५० क्विंटल तर ज्वारीची ३ हजार ५९८.५० क्विंटल खरेदी करण्यात आली.
धुळे जिल्हयात १३ हजार क्विंटल भरडधान्याची खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 11:21 AM
७३५ शेतकºयांनी केली होती आॅनलाइन नोंदणी
ठळक मुद्दे१ नोव्हेंबरपासून सुरू झाली होती खरेदी७३५ शेतकºयांनी केली होती नोंदणीसाक्री केंद्रावर धान्याची आवक नाही