थाळनेर : शिरपूर तालुक्यातील भोरटेक येथे कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला़ परिसरातील शेतकºयांना याचा फायदा होणार आहे़ शिरपूर तालुक्यातील खासगी व्यापारी सुरेश लुका पाटील यांनी भोरटेक गावातील प्रगतशील शेतकरी मच्छिंद्र बळीराम जाधव यांच्याकडून ४० किलो कापूस खरेदीचा मुहूर्त सुरेश लुका पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. कापूस मुहूर्ताचा भाव ५ हजार १०० रुपये देण्यात आला. यावेळी रघुनाथ गंभीर चौधरी, भाईदास भिका जाधव, जोगेंदर रमण जाधव, साहेबराव हिरामण जाधव, नामदेव छगन जाधव, मापाडी सुनील मराठे थाळनेर यांच्यासह शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते़ यावर्षी वरुण राजाने परिसरात पावसाची रिपरिपसह दमदार पावसाची हजेरी सतत लावल्यामुळे परिसरातील बागायतदार शेतकºयांचे संकरीत कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता शेतकºयांकडून वर्तविण्यात येत आहे. त्यासोबत परिसरात नेहमीच दमट हवामानामुळे शेतकºयांना महागडी कीटकनाशक औषधांची फवारणी करावी लागल्यामुळे शेतकºयांचा मोठ्या प्रमाणात पैसा खर्च झालेला आहे़ त्यामुळे संकरीत कापूस पिकाला ६ हजार पेक्षा अधिक भाव मिळावा, अशी अपेक्षा परिसरातील शेतकºयांमधून केली जात आहे.
भोरटेक येथे कापूस खरेदीला झाली सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2019 10:23 PM