धुळे : जिल्ह्यातून आजअखेर १४ हजार १४३ शेतकºयांकडून चार लाख ४९ हजार ६०६ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आह़े़ जिल्ह्यात खरीप हंगामात कपाशीची सर्वाधिक लागवड होते.जिल्हा कापूस उत्पादनात आघाडीवर आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाल्यावर धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष साहाय्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार, जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कापूस विक्रीसाठी शेतकºयांना आॅनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार धुळे जिल्ह्यातून एप्रिल व मे २०२० मध्ये १२ हजार कापूस उत्पादक शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली होती. कापूस खरेदीसाठी भारतीय कापूस निगम (सीसीआय) यांच्याकडून डी. आर. कॉटन जिनिंग प्रेसिंग, दहिवद शिवार, ता. शिरपूर, जि. धुळे, केशरानंद जिनिंग प्रेसिंग, अभिषेक जिनिंग प्रेसिंग, वर्धमान जिनिंग प्रेसिंग, दोंडाईचा, ता. शिंदखेडा, जि. धुळे तर महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघातर्फे जवाहर सहकारी सूतगिरणी, मोराणे, ता. जि. धुळे, पाटोदिया जिनिंग प्रेसिंग, मालेगाव, जि. नाशिक येथे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. तेथे शासकीय हमीभाव दराने कापूस खरेदी करण्यात येत आहे. शेतकºयांकडील एफएक्यू प्रतीचा कापूस ५ हजार ११० ते ५ हजार ३५५ रुपये प्रतिक्विंटल या दराने खरेदी करण्यात येत असून ३० सप्टेंबर २०२० पर्यंत केवळ एफएक्यू प्रतीचा कापूस खरेदी करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे यांनी दिली आहे.जिल्हाभरात साडेचार लाख क्विंटल कापूस खरेदी१२ हजार शेतकºयांची आॅनलाईन कापूस नोंदणी : १४ हजार १४३ शेतरकºयांकडून करण्यात आली कापूस खरेदीलोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्ह्यातून आजअखेर १४ हजार १४३ शेतकºयांकडून चार लाख ४९ हजार ६०६ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आह़े़ जिल्ह्यात खरीप हंगामात कपाशीची सर्वाधिक लागवड होते.जिल्हा कापूस उत्पादनात आघाडीवर आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाल्यावर धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष साहाय्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार, जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कापूस विक्रीसाठी शेतकºयांना आॅनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार धुळे जिल्ह्यातून एप्रिल व मे २०२० मध्ये १२ हजार कापूस उत्पादक शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली होती. कापूस खरेदीसाठी भारतीय कापूस निगम (सीसीआय) यांच्याकडून डी. आर. कॉटन जिनिंग प्रेसिंग, दहिवद शिवार, ता. शिरपूर, जि. धुळे, केशरानंद जिनिंग प्रेसिंग, अभिषेक जिनिंग प्रेसिंग, वर्धमान जिनिंग प्रेसिंग, दोंडाईचा, ता. शिंदखेडा, जि. धुळे तर महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघातर्फे जवाहर सहकारी सूतगिरणी, मोराणे, ता. जि. धुळे, पाटोदिया जिनिंग प्रेसिंग, मालेगाव, जि. नाशिक येथे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. तेथे शासकीय हमीभाव दराने कापूस खरेदी करण्यात येत आहे. शेतकºयांकडील एफएक्यू प्रतीचा कापूस ५ हजार ११० ते ५ हजार ३५५ रुपये प्रतिक्विंटल या दराने खरेदी करण्यात येत असून ३० सप्टेंबर २०२० पर्यंत केवळ एफएक्यू प्रतीचा कापूस खरेदी करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे यांनी दिली आहे.
जिल्हाभरात साडेचार लाख क्विंटल कापूस खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 10:31 PM