आॅनलाइन लोकमतधुळे : नाफेडच्यावतीने धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील सहा केंद्रावर आॅनलाइन पद्धतीने हरभºयाची खरेदी सुरू झालेली आहे. गेल्या आठ दिवसात ३ हजार ५८१. ०४ क्विंटल हरभरा खरेदी झाला आहे.राज्य शासन व नार्फेडतर्फे मूग, उडीद, सोयाबीन, तूर पाठोपाठ आता हरभºयाची आॅनलाइन खरेदी सुरू केली. आहे. यात धुळे जिल्ह्यातील धुळे, शिरपूर, साक्री, दोंडाईचा येथे तर नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार व शहादा येथे हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. ६ एप्रिलपासून ही खरेदी सुरू झालेली आहे.हरभºयाची प्रथमच खरेदीगेल्यावर्षी नाफेडतर्फे आॅनलाइन खरेदी करण्यात आलेला नव्हता. या वर्षी प्रथमच आॅनलाइन नोंदणी पद्धतीने खरेदी केला जात आहे.आतापर्यंत ३५८१ क्विंटल आवकगेल्या आठ दिवसात धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील केंद्रावर आतापर्यंत ३ हजार ५८१ क्विंटल हरभºयाची आवक झालेली आहे. यात धुळे येथे ८७६.३५, शिरपूर- १२८६.६५, दोंडाईचा-६४६.४०, साक्री-२२३.८३, नंदुरबार १२२.८० तर शहादा येथे ४२५ क्विंटल हरभºयाची खरेदी झालेली आहे.हरभºयाची हमीभाव खरेदीसाठी आॅनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा मार्केटींग फेडरेशनतर्फे करण्यात आलेले आहे. दरम्यान हमीभाव खरेदी केंद्रावर नोंदणी करतांना शेतकºयांनी ७-१२ उतारा, बॅँकेचे पासबुक, आधारकार्ड झेरॉक्स, पीकपेरा आदी कागदपत्रे जोडणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले.१८ हजार क्विंटल तूर खरेदीधुळे- नंदुरबार जिल्ह्यातील पाच खरेदी केंद्रावर १ फेब्रुवारी २०१८ पासून आॅनलाइन नोंदणीने तुरीची खरेदी सुरू झाली. १३ एप्रिल अखेरपर्यंत १७ हजार ९९९.३२ क्विंटल तूर खरेदी करण्यात आलेली आहे. यावर्षी आॅनलाइन तुर खरेदीलाही चांगल्या पैकी प्रतिसाद मिळाला आहे.