बळसाणे : नवापूर येथील श्री सुरुपसिंग हिऱ्या नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील प्रा. किशोर चैत्राम सोनवणे यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून नुकतीच शिक्षणशास्त्र विषयातून पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.त्यांनी ‘आदिवासी व बिगर आदिवासी विद्यार्थ्यांचा सामाजिक आर्थिक स्तर, समायोजन आणि शालेय प्राविण्य यांचा तुलनात्मक अभ्यास’ या विषयावर संशोधन कार्य केले आहे. मार्गदर्शक म्हणून डॉ़ गौरी विजय पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. यासाठी डॉ़ मनिषा इदानी व बहिस्थ परीक्षक म्हणून डॉ़ प्रमोद कुमार नाईक लाभले. तसेच एसएनडीटी शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ़ नलिनी पाटील, अधिष्ठाता व प्राचार्या लता मोरे, डॉ. मंदा मोरे, डॉ़ संजय अहिरे, डॉ़ पुष्पा पाटील, डॉ़ जगदीश काळे, डॉ़ नितीनकुमार माळी, प्रा फिलीप गावित यांचे विशेष सहकार्य लाभले.संस्थेचे अध्यक्ष सुरूपसिंग नाईक, आरिफ बलेसरिया, आमदार शिरीषकुमार नाईक यांनी समाधान व्यक्त केले़ प्राध्यापक सोनवणे हे मुळ बळसाणे येथील रहिवासी आहेत़ ते जिल्हा परिषद शाळेचे माजी मुख्याध्यापक चैत्राम सोनवणे यांचे सुपुत्र आहेत़ प्रा. किशोर सोनवणे यांच्या यशाचे कौतुक बळसाणे ग्रामस्थांसह मित्रपरिवारातून होत आहे़
प्रा. किशोर सोनवणे यांना पीएचडी पदवी प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2020 10:15 PM