ऑनलाईन लोकमत धुळे, दि.29 - मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाचे काम लवकरच होणार असून या मार्गासाठी लागणा:या 3 हजार 538 हेक्टर जागेचे भूसंपादन नवीन कायद्यानुसार केले जाईल, या रेल्वेमार्गामुळे आतार्पयत अविकसित राहिलेल्या धुळे जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल, अशी माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी पत्रकार परिषदेत दिली़ सदर रेल्वेमार्गाचा डीपीआर (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट) 3 जुलै 2017 ला तयार करून तो काही दिवसांपूर्वी रेल्वे बोर्डाला सादर केला गेला व प्रत्यक्ष कामाला सुरूवात होण्याच्या दृष्टीने तयारी सुरू झाली आह़े नवीन भूसंपादन कायद्यानुसार जमिन संपादीत केली जाणार असल्याने शेतकरी व जमिन मालकांचे नुकसान होणार नाही़ लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, मंत्री यांनी वेगवेगळया सूचना मांडल्या असून त्यात नवीन रेल्वेमार्गाचे सव्रेक्षण, सव्रेक्षण झालेल्या मार्गाच्या कामाची सुरूवात, रेल्वेमार्गाच्या सुरू असलेल्या कामांना गती देण्याचा प्रश्न तसेच काही नवीन रेल्वे सुरू करण्याबाबतच्या सूचनांचा समावेश आह़े या प्रत्येक सूचनेचा रेल्वे मंत्रालयाकडून विचार केला जाईल, असे प्रभू म्हणाल़े भुसावळ-मुंबई अशी नवीन रेल्वे सुरू करण्यात यावी अशी मागणी सातत्याने होत आली आह़े जळगावला सुरू असलेले दुपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर ही नवीन रेल्वे सुरू केली जाईल़ नंदुरबार, अमळनेर, भुसावळ मार्गे ही रेल्वे राहणार असल्याचे रेल्वे मंत्रालयाचे अधिकारी शर्मा यांनी सांगितले. दादर-अमृतसर या रेल्वेत बोगी वाढविण्याची मागणी होत होती़ त्यामुळे या रेल्वेत एसी फस्र्ट व एसी 2 टायर कोच सुरू केले जाईल़ त्याचप्रमाणे धुळे-पुणे प्रवासासाठी सध्या 2 बोगी उपलब्ध करून देण्यात येत आहेत़ धुळे-चाळीसगाव विद्युतीकरणाचे काम लवकरच सुरू होणार असून ते पूर्ण झाल्यानंतर बोगींची संख्या वाढविली जाईल, असे शर्मा यांनी स्पष्ट केल़े
रेल्वेमार्गाचे भूसंपादन नवीन कायद्यानुसार : सुरेश प्रभू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 6:10 PM
धुळे-पुणे प्रवासासाठीही दोन बोगींची घोषणा
ठळक मुद्देमनमाड-इंदूर रेल्वे मार्गाचा रेल्वेबोर्डाला ‘डीपीआर’ सादररेल्वे भूसंपादनामुळे शेतक:यांचे नुकसान नाही!भुसावळ-मुंबई नवीन रेल्वे लवकरच सुरु होणार दादर-अमृतसरला वाढीव बोगी