लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांची दुपारी सभा असल्याने जिल्ह्यासह बाहेर गावाहून पदाधिकारी आणि कार्यकर्ते धुळ्यात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे़ धुळ्यासह साक्री, शिरपूर, शिंदखेडा तालुक्यातूनही उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून दुचाकी आणि चारचाकी वाहने धुळ्यात येत आहे़ पार्किंगच्या ठिकाणी वाहने लावली जात असून पायीपायी सभास्थळी काही जण आत्तापासूनच रवाना होत आहे़ काही ठिकाणी तर दुचाकीवर झेंडे लावून कार्यकर्ते फिरत असल्याने वातावरण निर्मिती होऊ लागली आहे़ काही प्रमुख पदाधिकारी तर गोंदूर विमानतळाकडे रवाना झालेली आहेत़
धुळ्यातील राहुल गांधींच्या सभेला गर्दी होण्यास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2019 1:57 PM