सुनील साळुंखे ।लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : धुळे येथून ‘रोड शो’ करीत महामार्गावरील गावां-गावातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी हस्तांदोलन करत खासदार राहुल गांधी शिरपुरात पोहचले होते़ त्यांचे शिरपूरवासियांनी जल्लोषात स्वागत केले होते त्यांना पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली होती़ ही स्थिती ५ मार्च २०१४ रोजी सायंकाळची आहे़शिरपूर फाट्यावर खासदार राहुल गांधी यांचे आगमन झाले होते़ त्यांच्या समवेत तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे हे खुल्या वाहनावर होते़ त्यांच्या अंगावर जागोजागी फुलांचा वर्षाव करण्यात येत होता़शिरपूर फाट्यावर स्वागत झाल्यानंतर चोपडा जीनपासून मेनरोड मार्गाने एसपीडीएम कॉलेज, निमझरी नाका, पित्रेश्वर कॉलनी पाँईट, करवंद नाका, मुकेशभाई पटेल टॉऊन हॉल येथे ‘रोड शो’ची सांगता झाली होती़ मार्गावर त्यांना पाहण्यासाठी जनसागर ठिकठिकाणी ऊसळला होता़ अनेक जण इमारतीवर उभे होते़ उत्साही काँग्रेसचे कार्यकर्ते जल्लोषात राहुल गांधी जिंदाबाद, अमरिशभाई जिंदाबादच्या घोषणा देत होते़ मार्गावर ठिकठिकाणी आदिवासी बांधव त्यांच्या आदिवासी नृत्यावर ठेका धरत मग्न होते़ शहरातील वातावरण संपूर्णपणे काँग्रेसमय झालेले होते़ जागोजागी स्वागतांचे डिजीटल फलक, पक्षाचे ध्वज लावण्यात आले होते़ जलसंधारणाचा शिरपूर पॅटर्न तालुकास्तरावरून राज्य-राष्ट्रात राबविण्याचा विचार देखील त्यांनी बोलून दाखविला होता़ शहरातील अनेक महिला-पुरूष, लहान बालकांसह तरूणाईने खासदार गांधी यांच्याशी हस्तांदोलन तर अनेकांनी गुलाब पुष्प देवून स्वागत केले होते़ दिवसभर कार्यक्रमात व्यस्त असतांना देखील गांधी यांच्या चेहऱ्यावर थकवा अजिबात जाणवत नव्हता़सायंकाळी शहरातील मुख्य बाजारपेठेसह निम्मे शहर अंधारात होते़ यामुळे रोड शो मध्ये अनेक अडचणींना समोरे जावे लागत असतांनाच आयोजकाकडून जनरेटरद्वारे उजेड करण्यात आला होता़ ही २०१४ मधील आठवण आजही ताजी आहे़
राहुल गांधींच्या ‘रोड शो’ गर्दी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 10:26 PM