लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : परभणी महापालिकेचे आयुक्त राहूल रेखावार हे धुळ्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून येत आहेत. तर विद्यमान जिल्हाधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे यांची मुंबई येथील एम.एस.फिशरीज डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली झाली आहे. बदली संदर्भातील आदेश आजच आपणास प्राप्त झाले. आपण गुरूवार १९ रोजी धुळे येथील जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारणार आहोत, असे राहूल रेखावार यांनी ‘लोकमत’शी दूरध्वनीवरून बोलताना सांगितले. ते २०११ च्या आयएएस बॅचचे अधिकारी आहेत. पीक कर्ज वितरित करण्याचे आव्हान जिल्हाधिकारी डॉ.पांढरपट्टे हे २०१६ मध्ये येथे रूजू झाले होते. त्यांनी येथील आपल्या पावणेदोन वर्षाच्या कार्यकाळात जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांसह जिल्ह्यातील सातबारा उतारे आॅनलाईन, नवीन तलाठी सजे व मंडळांची निर्मिती, कोतवाल भरती आदी विविध कामांना गती दिली. तर नवे जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्यापुढे यंदाच्या खरीप हंगामाकरीता जिल्ह्यातील सर्व शेतकºयांना पीक कर्ज वितरित करण्याचे मुख्य आव्हान असणार आहे.